श्री देव मुळपुरुष- तेली सातार्डेकर परिवार तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग
तेली समाजाचा विस्तार हा प्रामुख्याने संपूर्ण भारतात विविध ठिकाणी विविध नावाने झाला आहे. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यात साता हे गाव गोव्याच्या हडीवर वसले आहे. या गावातसुध्दा तेली समाजाचे फार पूर्वीपासून वास्तव्य होते. त्यांना तेली सातार्डेकर म्हणून ओळखले जात असे.
परंतु काही कारणास्तव गावातील सर्व तेली बांधव जवळच्या गोवा राज्यात तसेच सावंतवाडी, वेंगुला, कुडाळ, मालवण व अन्य ठिकाणी आपल्या परिवारासह स्थानिक झाले. त्यावेळी ज्या तेली बाधवाने आपल्याबरोबर मुळपुरुष घेऊन आला तो वेंगुर्ला या ठिकाणीच्या राऊळवाडा याठिकाणी स्थायिक झालेत. त्याने त्या ठिकाणी एक छोटेसे घर बांधले आणि त्या ठिकाणी आपला संसार थाटला. त्याचबरोबर त्याने सातार्डा येथून आणलेल्या मुळपुरुषांची स्थापना केली.त्याची नित्यनेमानेदर तीन वर्षांनी होमहवन केले जात असे. त्यामध्ये होडावडा, तुळस आणि वेंगुर्ला याठिकाणचे तेली सातार्डेकर सहभागी होत असत.
नंतरच्या काळात या प्रक्रियेतखंड पडूनते घर पडून जमीनदोस्त झाले आणि मुळपुरुष उघड्यावर पडला. त्याला कोणीच वाली राहिला नाही. म्हणून होडावडा, तुळस आणि वेंगुर्ला या ठिकाणच्या तेली सातार्डकर बांधवानी एकत्र येऊन मुळपुरुषाचे कार्य करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सर्वबांधवानी एकत्र येऊन त्या जमिनदोस्त घरावरच ज्या ठिकाणी मुळपुरुषाचे स्थान होते त्याठिकाणी छोटीशी घुमटी बांधून त्यामध्ये मुळपुरुषाची स्थापनाकरुन पूजाअर्चा सुरु केली. तसेच दर तीन वर्षांनी मुळपुरुषाचे पतीर आणि होम हा कार्यक्रम सुरु झाला.
हा कार्यक्रम गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत होमहवनास अनुकुल दिवसपाहून केव्हाही करता येतो. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी गोसाव्याच्या हस्ते नारळ व कोंबडा मानवून त्याठिकाणी गा-हाणे घालून कोंबड्याचा बळी दिला जातो नंतर त्या कॉबड्याचे मटणाचे जेवण केले जाते. गोसावी आपल्याबरोबर येताना दुधी भोपळ्यापासून बनवलेले पात्र (ज्याला पतीर असे म्हणतात.) आणतो ते पतीर त्या जेवणाने पूर्ण भरले जाते आणि गोसावी परत गाम्हाणे घालून ते भरलेले पतीरघरीधेऊनजातो. नंतर सर्व बांधवाना त्या जेवणाचा प्रसादवाढवला जातो..
दुसऱ्या दिवशी ब्राह्मणामार्फत होमहवन करुन मुळपुरुषाचा नारळ बदलून नवीन नारळ पूजन केला जातो. तसेच ब्राह्मणाकरवी मुळपुरुषाला महानैवेद्य दाखविला जातो. तसेच ब्राह्मणभोजन केले जाते. नंतर सर्व तेलीबांधव आणि उपस्थित लोकांना महाप्रसाद वाढला जातो. या सर्व कार्यक्रमात मुख्यत्वे होडावडा, तुळस आणि वेंगुर्लाया ठिकाणचे बांधव आनंदाने आर्थिक आणि प्रत्यक्ष सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात सामिल होतात.
अलिकडच्या काळापर्यंतहा कार्यक्रम दर तीन वर्षांनी होत असे. परंतु युवापिढीच्या पुढाकाराने आणि आपल्या मुळपुरुषाबद्दल तेलीबांधवांच्या मनात जागृती निर्माण झाल्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा होतो. नित्यनियमाने रोज पूजाअर्चा करण्यासाठी वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरनजिक राहणारे आपलेच बांधव आणि उज्ज्वला सायकल स्टोअर्सचे मालक श्री. भाऊसातार्डेकर यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
जरी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असला तरी त्याची वास्तू मात्र अजूनही फक्त पडक्या घराच्या चौथ्याच्या स्वरुपात उपेक्षित राहिली आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्यावेळी किंवा मूळपुरुषाला भेटायला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे हा कार्यक्रम सहज संपन्न होतो. भविष्यात जर का समस्त तेली - सातार्डेकर बांधवांनी एकत्र येऊन या जमीनदोस्त वास्तूला एखाद्या मंदिराचे स्वरूप देण्याचे ठरवले तर निश्चितच मुळपुरुषाचे महत्त्व वाढून त्याची प्रसिध्दी, वाटेल. जेणेकरुन मुळपुरुषाचा वंशज किंवा येणारा माधिक त्याच्या सान्निध्यातदोन मिनीटे विसावू शकेल.