पुण्यात सुरवात झालेला मेळावा नाशीकात स्थिरावला. प्रथम खिशातले गुंतवा मग खिसे भरा हा प्रोफेशनल मेळावा प्रतिष्ठेचा झाला. मेळाव्यासाठी कार्यकर्ते स्वयंभु महाराष्ट्र भर निर्माण झाले प्रसंगी व्यवसाय, नोकरी घरदार सोडून राबु लागले. आमचा भव्य दिव्य कसा या साठी स्पर्धा सुर झाली. या स्पर्धेत एक विकृती निर्माण झाली सहज जरी मेळाव्यातील उपस्थीत मंडळी पाहिली मेळाव्यातील पुस्तीका पाहिली तर ठळक नजरेत भरेल मराठा समाजाच्या देणग्यांचा पाऊस पडू लागला आहे. काही काही मेळाव्यांना लाखो रुपयांच्या देणग्या मराठा समाजातील तालेवार देत असतात. आशा या पैशातून भव्य दिव्य मेळावे आकाराला आले. हे अकारताना येताना समाजातील विद्यार्थींना मिळणारी शिष्यवृत्ती, नोकरीचे आरक्षण, शैक्षणीक प्रवेश राजकीय राखीव जागा याच मराठा मंडळींनी मराठा-कुणबी ही प्राणपत्रे लाखो रूपये देऊन मिळवलेली आसतात आपल्या बनावटगीरीला कोणी चुळबुळ करू नये यासाठी हे सावध मराठे वधु-वर मेळाव्याला भरमसाठ देणग्या देत आहेत. हा विचार सुद्धा या मंडळींना स्पर्श करत नसेल तर समाजाशी ही यांची इनाम राखण्याची भव्य दिव्य परंपरा मानली पाहिजे. आशा देणग्या घेणार्या मेळाव्यातील मंडळींना विचारले बाबांनो आपल मरण कर्ते आहेत. त्यांचे उत्तर आमचे गुंतवलेल वसुल करून भव्य दिव्य बनवण्या सत्यांनी न मागता दिले. हे आसे नेते निर्माण होण्याची फॅक्टरी सध्या जोरात चालू आहे. बर्याच आशा मंडळींना महाराष्ट्र तेली महासभेेचे हाय कमांड उपस्थीत राहून तोंडभर कौतुक करतेच उलट यांना पदांच्या महाप्रसाद देऊन टाकते. आसा हा महाप्रसाद मिळाल्या नंतर कानात वारे संचारल्या मुळे ही मंडळी चौफेर उधळत असता. या ठिकाणी पहिली संस्था आसते परंतु गुंतवा वसुल करा व कमवा हा कान मंत्र हायकमांडने आपल्या आशीर्वादाने व आदेशाने दिल्या कारणाने त्या गावात शहरात दोन गट समाज पातळीवर निर्माण होतात. व ते कार्यरथ रहातत माझ्याकडे अनेक गावातील शहरातील बांधवानी या बाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. या मंत्रा मुळे समाजाची घडी विस्कटली भांडणे म्हणजे समाजार्य समाजाला गाडणारा हा जो मराठा - कुणबी भस्मासुर आहे त्या बद्दलन ब्र काढता त्याच्या समोर नतमस्तक होणारी फौज निर्माण करण्याची प्रेरणाच मिळत आसते.
जय संताजी
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade