कुडाळ तालुक्यातील आकेरी गावात होळीपूर्वी दोन दिवस धालोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. या गावात तेलीवाडीने 'धालो' हि परंपरागत उत्सवाची जपणूक केली आहे. पहिल्या दिवशी सर्व स्त्रिया एकत्र येऊन त्यातील जाणकार स्त्री समई पेटवून केळीच्या पानावर तांदूळ तसेच खण, नाळ, केळी, कुंकू या सर्व पूजेच्या साहित्यासह माडून देवतांचे आवाहन केले जाते. सर्वजणी हळदीकुंकू लावून धालोत्सवास प्रारंभ होतो. त्यानंतर ओव्या गायिल्या जातात. नंतर निरनिराळे करमणूकीचे खेळ खेळले जातात. सांगता समारोहाच्या आधी दोन दिवसप्रतिकात्मक डुकराची शिकार केलीजाते. यात १० वर्षांच्या आतील मुलींचा समावेश असतो. सरतेशेवटी अकरावा दिवस लग्न समारंभ डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा असतो. लग्न विधी समारंभपूर्वक पार पाडले जातात. यात 'नवरा' म्हणून एक स्त्रीला सजविण्यात येते. " आजच्यान धालो काबार झालो धाल्याच्या माथ्यार शेणाचो कालो' असे म्हणत समारोह पूर्ण होतो. श्री देव नसिंह मंदिरात वार्षिक कार्यक्रम नित्यनियमाने साजरे केले जातात. याला समाजातील मडळींची लक्षणिय उपस्थिती असते.