देवगड तालुक्यातील जामसंडे वेळवाडी (मळई) येथील तेली समाज बांधवांचे जामसंडे - विजयदुर्ग सागरी महामार्गावर जामसंडेपासून सुमारे ४ किमी अंतरावर श्री मेळेकर देवस्थान आहे. जामसंडे गावच्या बारा रहाटीमध्ये पूर्वी तेली हा मानकरी होता. काळानंतराने आता मानकरी राहिलेला नाही. ग्रामदेवता श्री दिदिवी - रामेश्वराकडे जेव्हा एखादा न्याय मिळत नाही तेव्हा अंतिम न्यायासाठी श्री देव मेळेकराकडे यावे लागते. या मेळेकर देवस्थानची सर्व जबाबदारी तेली समाज बांधवांकडे आहे. मळई येथील तेली समाजाचे पाच पाळीदार आहे. त्यांच्याकडे आळीपाळीने या मेळेकर देवस्थानची पूजाअर्चा असते. हे देवस्थान जागृत असून येथे अस्वच्छता चालत नाही. ज्यावेळी ग्रामदेवतेकडे न्याय होत नाही त्यावेही मेळेकर देवस्थानकडे न्याय घेतला जातो. मेळेकर देवस्थानाला आद्य देवस्थान म्हटले जाते. तेली समाज बांधवांच्या हाकेला धावणारा व त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारे हे देवस्थान आहे. या देवस्थानाच्या ठिकाणी डाळप, नैवेद्य, त्रिपुरारीला टवळी लावण्याचा उत्सव असतो. गेली अनेक वर्षे हे दुर्लक्षित असलेले देवस्थान नव्या पिढीने लाखो रुपये खर्च करुन जिर्णोध्दार केला आहे. आज सुंदर व पर्यटनदृष्ट्या एक चांलगे ठिकाण ठरत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनंतर दोन ते तीन दिवसांत येथे नैवेद्यांचा कार्यक्रम असतो. यावेळी मुंबईकर चाकरमानी तसेच सर्व तेली समाज बांधव उत्सव साजरा करतात.