कोर्ले येथील श्री विठ्ठलादेवी देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख विश्वस्त विश्वनाथ खानविलकर आहेत. हे येथील तेली बांधवांनी स्थापन केलेले मंदिर आहे. या मंदिराचा दरवर्षी ११ मेला वर्धापन दिन असतो. या वर्धापन दिनानिमित्त या मंदिरात जत्रा भरते. गावानजिकच्या रत्नागिरी जिल्हातील तसेच कणकवली तालुक्यातील प्रमुख देवस्थानच्या पालख्या या जत्रोत्सवासाठी येतात. येथे पालखी मिरवणूक उत्सव पाहण्यासारखा असतो. कोर्ले येथील प्रसिध्द ढोलपथकही या उत्सवात सहभागी होऊन आपली कला सादर करतात. अनेक राजकीय नेतेदेखील या मंदिराच्या उत्सवाला हजेरी लावतात.या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांसाठी महिनाभर ग्रंथवाचनाचा कार्यक्रम असतो. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. देवीची ओटी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. आपणही या मंदिराला भेट देऊन आपल्यसा समाज बांधवांकडून केल्या जाणाऱ्या कार्याचे आपण कौतुक करायला हवे. खारेपाटणपासून सुमारे १० कि.मी. तर देवगडापासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे.