स्वातंत्र्यसैनिक कै. वामनराव विष्णू कवटकर (जन्म १५/७/१९१७ मृत्यू ११/११/१९८९)
१९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल आणि मालवण देवूळवाडा येथील पोलीस चौकीजाळल्याबद्दल कै. वामनराव कवटकर यांना ब्रिटीश सत्तेने पकडून ३० सप्टेंबर १९४२ ते १० जून १९४३ या कालावधीत सक्तमजूरीचीशिक्षा देवून रत्नागिरी येथील डिस्ट्रिक्ट जेलमध्ये डांबून ठेवले. शिक्षा भोगून आल्यानंतर कै. आप्पा साहेब पटवर्धन यांच्या बरोबर विविध सत्याग्रहात भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर मालवण तालुका काँग्रेस कमिटी सभासद म्हणून कार्य केले. कै. इंदिरा गांधीच्या काळात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर मूळ काँग्रेस पक्षात ते अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले.
सन १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात मालवण तालुक्यातील मौजे कुमामे येथील स्वकष्टार्जित ४४४ गुंठे जमीन महाराष्ट्र शासनाला, भूमीहीन लोकांना घर बांधण्यासाठी बक्षिस दिली. त्याबद्दल शासनातफ त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्यसैनिक कै. वसंतदादा पाटील यांच्याहस्ते त्याना स्वात सैनिक सन्मानपत्र आणि ताम्रपट देण्यात आला.
- श्री. दशरथ कवटकर