कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे, याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग लढाई लढत आहे. त्याकरिता राज्य शासनाचा निधीची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार, पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था, ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधीकरिता जे आवाहन केले आहे, त्याला अनुसरून संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे या तेली समाज संस्थेच्या ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या विश्वस्तांनी २५ हजार रु पयांची मदत दिली आहे, अशी माहिती श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली. याप्रसंगी अध्यक्ष शिवदास उबाळे, कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी, मुख्य चिटणीस राजेश येवले, उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे, पोपटराव पिंगळे, सुलोचना कर्डिले, खजिनदार दत्तात्रय शेलार, भिकाजी भोत, पंडित पिंगळे, आप्पा शेलार, प्रशांत भागवत, शैलेश मखमाले, सतीश वैरागी, विमल वाव्हळ आदी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade