ऑक्टोबर तेली गल्ली 2009
औरंगाबाद :- प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी तेली समाजातील विविध क्षेत्रात असलेले पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचा तिळवण तेली संताजी समाज सेवा मंडळ तैलीक युवक आघाडी, संताजी ग्रुप फाऊण्डेशन, यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन टाळ्यांच्या प्रचंड गडगडात यांचा सत्कार श्री गणेश मंगल कार्यालय, सिडको बस स्टॅण्ड, या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांचा परिचय करून प्रमुख अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होऊन मान्यवरांचा व प्रमुख अतिथींचा मंडळावतीने सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी ४,७,१२, पदवी व पदविका व इतर विविध क्षेत्रातील १६५ मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थीनी यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांमध्ये येवला तालुका, जिल्हा नासिक येथील नगराध्यक्षा सौ. जयमाला सुनीलराव जाधव तसेच बंडूशेठ क्षिरसागर, तसेच नगरसेवक व नगरसेविका यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विश्वनाथसेठ गवळी यांनी त्यांच्या स्व.मुलीच्या स्मरणार्थ १२ वी विज्ञान मधील प्रथम श्रेणीतील चार विद्यार्थीनींचा प्रमाणपत्र व रूपये ५००/धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी ते हा उपक्रम राबविणार आहेत.
प्रास्ताविक भाषणामध्ये मंडळाचे जिल्हाध्यक्ष कचरू वेळंजकर यांनी आपले विचार मांडतांना सांगीतले की, मंडळाचे हे गौरवशाली ९ वे वर्ष असून दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे विविध उपक्रम राबवितील. यामध्ये रक्तदाय शिबीर, संत महंतांच्या जयंत्या व पुण्यतिथी महोत्सव, वधूवर,पालक परिचय मेळावा, समाज जन जागृती, ग्रामीण मेळावे, समाज संघटन, असे बरेच सामाजिक उपक्रम राबवितील. या नंतर विविध क्षेत्रातील प्रमुख अतिथींनी आपले मौलीक असे विचार मांडले, व मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र ओ.बीसी. जनजागरण संघर्ष समिती चे संस्थापक अध्यक्ष, तथा दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांनी घनघाती विचार मांडतांना सांगीतले की, श्री संत जगनाडे महाराज हे कवळ तेली समाजाचे संत नसून संत हे सर्व समाजाचे असतात. संतांच्या विचाराचे आचरण आपण केले पाहीजे. संत जगनाडे महाराजांचे पोष्टाचे तिकीट निघण्यामागे सर्वांचे सहकार्य लाभले परंतू विशेष करून खासदार विजयजी दर्डा, खासदार प्रफुल्लजी पटेल, आमदार राजेन्द्रजी दर्डा यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला व त्यासाठी त्यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले याची आठवण आपण ठेवावी.
आरक्षण संदर्भात आपले घनघाती विचार मांडतांना त्यांनी सांगीतले की, गांवाच्या सरपंचापासून अख्खा महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात असतांना आम्हाला ओबीसी म्हणा हा कुठला न्याय झाला. ओबीसी बांधवांनी आता एक झाले पाहिजे, आपल्या हितासाठी व आपल्या मागण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. माझ्याकडून जे सहकार्य लाभले ते मी माझ्या परिने करील असे त्यांनी सांगीतले.
प्रमुख अतिथीम्हणून मासिक स्नेहिजन चे संपादक छगनराव मुळे प्रसिद्ध उद्योगपती एस.के.चौधरी, उद्योगपति महाकाळ साहेब, मगर साहेब, जे.यु. मीटकर, प्रल्हाद दादा शिदलंबे, स. सो. खंडाळकर, पंडितराव तुपे, भगवानराव तुपे, श्रगवानराव मीटकर, बाबासाहेब राऊत, हरिभाऊ जाधव, विश्वनाथशेठ गवळी, डॉ. विजय कुमार मेहेर, बापुराव वाळके, दादासेठ परंडित, अँड. विठ्ठलराव साबणे, अॅड. बागुलसर, काशीनाथ मिसाळ, भारतसेठ कसबेकर व समाजातील सर्व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, कल्याणसेठ बरकसे हे होते. विशेष सत्कारमुर्ती म्हणुन गुणवंत विद्यार्थी सौ. जयमालाताई जाधव, बंडूभाऊ क्षिरसागर, हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष कचरू वेळंजकर यांनी केले. सुत्र संचालन बाबासाहेब पवार, सुरेश कर्डिले, राहुल मगर यांनी केले. आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष मनोज संत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठ मनोज संन्तासे, कचरू वेळंजकर, बाबासाहेब पवार, अंबादास देवराय, साई शेलार, सुरेश मिटकर, गोरख वेळंजकर, राहूल मगर, सोमनाथ सुरडकर, घोंडीराम वाळके, सुभाष रत्नपारखी, अशोक लोखंडे, रमेश उचीत, अशोक क्षिरसागर, पेंढारे, आदिंनी केले.