समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 2) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाज संघटनेचे वावटळ उटल्या नंतर संत संताजींना समजुन न घेता. संत संताजींचे नाव घेऊल दऱ्या खोऱ्यात ते मोठ मोठ्या शहरात समाजाच्या संस्था आकाराला आल्या. या संस्था व त्यांचे पुढारी समाज भान ठेऊन वाटचाल करतात त्यांच्या विषयी नम पणे माथा टेकावावे वाटतो. पण जिथे समाजाचे सोंग होऊन फसवणूक चालते त्यावर हाल्लेकेलेच पाहिजेत. अशा विकृतीवर समाज प्रशिक्षीत व्हावा हे महत्वाचे. पाच वर्षा पुर्वीची गोष्ट नेमकी लोकसभेची निवडणूक जाहिर झालेली. मी शरिर प्रकृतीमुळे सलग सहा महिने रजेवर होतो. आशा वेळी मे महिन्याची उन्हे डोक्यावर घेऊन समाजाचे दोन भाऊ माझ्याकडे आले. त्यातील एक प्रथमिक शिक्षक तर दुसरे समाजाचे माजी पदाधीकारी, त्यांचे शहर तालुक्याचे शहरात समाजाची अंदाजे २०० ते ३०० घरे समाजाचे मतदार १५०० ते २००० हजार. ही माझ्याकडे नोंद असलेली. बांधव सांगू लागले अध्यक्षांनी दहा ते १५ लाखाचा भष्ट्राचार केला. त्या शहरात ना समाजाची वास्तु ना समाज संस्था रजिस्टर. निमत्रंण देणाऱ्याला त्याचे पैसे कसेतरी मिळत होते. पुढाऱ्यांची खांदेपालट झाल्याली लग्नाचे पसे मयतीचे पैसे. किंन ज मासिक वर्गणी अशा प्राकारे वर्षात १० ते १५ ला. व हाणार नाही. जास्ती तास्त २ लाख जमा असतील आणि तर इतका मोठा घोटाळा हा प्रश्न त्यांनाच सोडवायास लावाला तेंव्हा टिपीकल पुढाऱ्यांचा कॅन्सर समाजाला कसा लागला. आहे हे प्रथम समोर आले. अध्यक्षाने स्वत:चा व्यवसाय वाढविण्यासाठी त्या भागातील विद्यमान सत्ताधारी मंडळीत उठबस सुरू केली. समाजाच्या मतांची हमी दिली. शासकीय योजनेत व्यवसाय बसवीला कमी दरात कर्ज, सबसिडी व उत्पादीत मालासाठी हक्काची बाजारपेठ सत्ताधारी मंडळीकडून मिळवली. या बदल्यात समाजाची मते वळवली. समाजा समोर फक्त काही थोडा मदतीचा हात सत्ताधाऱ्यांनी दाखविला तर आशा रस्त्यावरील समाज पुढाऱ्यांची ही साधी दिशा मी प्रथम नमुद केली.