समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 3) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाजाच्या आशा काही संस्था आहेत. त्या संस्थेचे वार्षिक उत्पन्न लाखो रूपये ही नाही. परंतू ही संस्था ताब्यात येण्यासाठी किंवा हातातून जाऊ नये या साठी पुढारी प्रसंगी समाज निवडाकीत लाखो रूपये ओतला प्रसंगी खाण्याची पिण्याची (सर्व प्रकारची) सोय करतात व संस्थेवर ताबा मिळवतात या मागचे गुपीत समाज बांधवांना मात्र अंधारात ठेवून वाटचाल आसते. समाजाचे अध्यक्ष व पदाधीकारी म्हणून प्रसिद्धी आसते. समाजात प्रतिष्ठा असते. आणि काही टिपीकल पुढारी जेंव्हा असे लाखो रूपय गुंतवतात ते या प्रसिद्धीला किंवा समाज प्रतिष्ठेला नाही तर काहींनी आता छुपा अजंठा राबविला आहे. त्या शहराची समाज संख्या लक्षात घेऊन त्या पुढाऱ्याला इतर समाज तेवढी किंमत देतात. ही किंमत नगरपालिका, ग्रामपंचायत ते खासदारकीच्या निवडणूकीत मिळते. समाजाची मते आपल्याला मिळावित यासाठी गोंजरले जाते. मतासाठी गाजवले जाते. मतासाठी हारतुरे दिले जातात. आणि मग कानात वारे शिरलेले पुढारी की ज्यात टिपीकल असतात ते छुपा स्वहिताचा अजंठा राबवतात. मग आपला व्यवसाय सुरू करणे, वादविणे किंवा रोखीत व्यवहार यात तरबेज झालेत. आणि क्षणात गुंतवलेले पैसे शेकडो पटीने वसुल करतात. समाज पातळीवर बोंब होऊ नये यासाठी समाज संस्थेला भरीव स्वरूप येण्यासाठी काही सोय करतात. ही टिपीकल वाट त्या पदाधीकारी मंडळीत कधी कधी वाटणी वरून किंवा ज्यांना अंधारात ठेवल्या मुळे उघड झाली तर स्वहिताची ही भांडणे खेळण्यास समाजाच्या डोक्यावर मारली जातत. आणि समाज पातळीवर गट तटाचा वाद तांडव नृत्याने खेळला जातो. समाज ही प्रशिक्षीत नसल्याने यात गुंतला जातो. जो गुंतत नाही तो आपला व्यवसाय, नोकरीत मग्न असतो. ही भयान अवस्था बऱ्याच शहरात आहे. जेथे नाही त्यांना पुन्हा एक वेळ वंदन पण जीथे टिपीकल वाट चाल आहे. त्यांच्या वाटेवर सुरूंग पेरण्याची आमची धडपड.