समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 4 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
संत संताजी महाराजांनो फक्त तुम्ही आशिर्वाद द्या कारण मी तुमच्या पाया पडतो. आणिा तुमच्या नावाने संस्था उभारतो किंवा पुर्वजांनी उभारलेल्या संस्थेचा पदाधीकारी बनतो. तुम्ही काय केले? तुमची वाटचाल कोणती ? तुम्हाला नावानिशी पुसण्याचा चंग ज्या ब्राह्मणी संस्कृतीने व मराठा वृत्तीने प्रयत्न केला. पण तरी तुम्ही सुर्यप्रकाशा सारखे का तळपत राहिला या गोष्टीशी आमचा संबंध काय ? तुमच्या नावाने गजर केला लय मोठे काय केले. तर हे टिपीकल आसे पुढारी बऱ्याच शहरात व गावो गावी गोस गवत दिसावयास पांढऱ्या फुलांचे पण तितकेच विषारी आसते हे फार उशीरा समजते. तर तैलिक महासभेत प्रथम शिरले. शिरताच त्यांनी आपली सोय करून घेतली. पदावा एक तुकडा किताब मिळाल्या सारखा कमरेला बांधला. आणि समाजाचा तुरा आपल्या डोक्यावर फेवीकॉलने पक्का चिकटविला आणि आपला टिपीकल पुढार पणाचा महा रस्ता निवडला. आज सुदंबरे संस्थेत किंवा तैलिक महासभेत जी शोकांतिका निर्माण झाली या शोकांतिकेची ही सुरूवात आहे. ही गोष्ट आम्ही त्या वेळी मांडली होती. ती मांडली म्हणुन आशा टिपीकल पुढाऱ्यांचा मस्तावला पणा ही अनुभवला. पण संत संताजींच्या अशिर्वादाने व त्यांच्या आचार विचाराने त्याररही मात केली. तर हे टिपीकल पुढारी समाजाच्या कार्यक्रमात दहा टक्के समाजाच्या गर्जना बेंबीच्या देठा पासुन देतात.या पुढे काय ? या पुढे काय तर समाज संस्थेचा पदाधिकारी हा किताब मिळवल्यामुळे सोईस्कर समाज विसरतात. लोकसभा विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या दरम्यान आपली गर्जना दुसऱ्यांना समजावी ग्राची व्यवस्था करतात. आणि कधी अंधारात, एकट्याने किंवा विश्वासु मंडळींना सोबत घेऊन तडजोडी करतात. ही तडजोड या दहा टक्के गप्पा मारणाऱ्यांनाच माहित असते.