समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 6 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीताना समता हा केंद्र बिंदू ठेवला. लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे ते बजावले पाहिजे. पण ते बजावताना समोरचा उमेदवार हा समाज हित साधणारा आहे हे तपासा समाज संस्थेचा विचार हा तपासा आणि त्याला मत द्या. तो उमेदवार समाजाला किती देतो. तो उमेदवचार समाज पुढाऱ्यांना अंधारात रोख किंवा त्याच्या व्यवसायात किती सहकार्य करतो हे जरूर तपासा. जो उमेदवार समाज हिता साठी. ओबीसी आरक्षणासाठी कृतीशील असेल आशालाच संधी द्या. ब्राह्मण मराठा विचारसरणीला साथ देऊ नका. ही मंडळी परस्परात भांडतात पण अंधारात समाज हितासाठी (त्यांच्या) एक असतात त्यांना समाजाची नवी ओळख करून द्या. अस्तीत्वात असलेल्या आपल्या पुढाऱ्यांना हे पटवून द्या. जे जागे आहेत ते समाज पुढारी त्या मार्गाने जातील हा सं संताजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा रस्ता आहे. जे ढोंगी आहेत. जे बुरखा पांघरून आहेत. जे टिपीकल आहेत. अशा लबाडाच्या गोड बोलण्याला, दमदाटीला समाजात उभी फट निर्माण करण्याचा कृतीवर विश्वास न ठेवता निर्णय घ्या. की जो विधान सभेत समाज हिताचे निर्णय घेईल. आपल्या मागण्या सोडवून घेईल. ओबीसी आरक्षणावर होणारे हाल्ले परतावून लावेल जो तेली किंवा ओबीसी उमेदवार नसेल तर ही पहिली काळजी घ्या. आणि ओबीसी, बीसी, तेली उमेदवार येतील. कुणाच्या तरी पैशावर उभे रहाणारे. अंधारात मते मिळवून कुणाला तरी विजयी करण्यासाठी आर्थिक तडजोड केलेला तेली ही उमेदवार आसु शकतो. सत्तेसाठी, पैशासाठी वाटेल ते करणारी डोमकावळे आता रस्तो रस्ती दिसतील त्यांना बाजुला सारून योग्य मतदान करा.
।। जय संत संताजी महाराज ।।