सप्टेंबर, तेली गल्ली 2009
भोसरी :- भोसरी तेली समजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मयुरी पॅलेस मंगल कार्यालयात दिनांक २/८/२००९ रोजी करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. दिलीप फलटणकर - पाठ्य पुस्तक निर्मीती मंडळावरील सल्लागार व राष्ट्रपती पदक विजेते हे होते. लसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका व श्री. महेश ढबाळे - व्यवस्थापक चाटे कोचिंग क्लासेस, श्री. नरेंद्र मेहेर - कार्याध्यक्ष, श्री. पोपटराव पिंगळे - तेली समाजाचे सल्लागार, श्री. भिकाजी भाजे, सौ. लिलाताई कहाणे, श्री. गणपत शिनगारे हे होते.
श्री. दिलीप फलटणकर यांनी मार्गदर्शन करताना मुलांना संगणक क्षेत्राकडे पाठवु नका. संगणक क्षेत्रातील हजारो इंजिनिअर परदेशाातुन परत येत आहेत. ते क्षेत्रही सुरक्षित राहीलेले नाही, मुलांना त्यांच्या कल्पनेने त्यांचे शिक्षणाचे क्षेत्र निवडू द्या. या पुढे १० वी पास परिक्षा राहाणार नाही, त्यामुळे मुलांवरील एका परिक्षेचा ताण कमी होणार आहे. असे सांगितले.
श्री विष्णू जाधव - शिक्षणाधिकारी यांनी मुलांना भोलाचे मार्गदर्शन केले. मुलांना डॉक्टर इंजिनिअर करण्यापेक्षा पदवी एम.पी.एस.सी. अगर तत्सम क्षेत्राकडील शिक्षण द्या मुलांच्या आवडीप्रमाणे त्यांना शिकवा असे सांगितले.
समाजाच्या वतीने इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ३ राष्ट्रीय खेळाडूंचाही त्यात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन भोसरी तेली समाजाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब शेलार, कार्याध्यक्ष श्री. विष्णूपंत ठेंगाळे, मुख्य सचिव श्री नितीन जगनाडे, महिला कार्यकारणी अध्यक्ष सौ. ज्याती जगनाडे सचिव श्री. विजय रत्नपारखी व श्री. दत्तात्रय शेलार, उपाध्यक्ष श्री. किशोर भुजबळ व श्री. भानुदास शेलार, युवक कार्यकारणी अध्यक्ष श्री. शिवराज शेलार, श्री. विलास लोखंडे, श्री. सुभाष शिरभाते, श्री. सुदाम चौधरी, सौ. रजनी दळवी, श्री. प्रदिप वाव्हळ, सौ. सुलोचना शिरभाते, सौ. ज्योती बारमुख, श्री. बंडोपंत शेलार यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.