बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.
बालमटाकळी ता. शेवगांव येथे श्री. संताजी जगनाडे महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा मंदिर कलशपूजन व तालुका पातळीवरील समाज मेळाव्याच्या प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी शनैश्वर फॉऊडेशन पुणे तर्फे बालमटाकळी संताजी युवक मंडळ व चोथे यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले तर कचरू । वेळंजकर, हरिभाऊ डोळसे आदीनी ही आपले विचार मांडले.
यावेळी पुढे बोलताना शिवाजीराव चोथे म्हधाले की, महाराष्ट्रही संताची भूमी असुन या भूमीत जन्मलेले सर्व जातीधर्माचा प्रचार, प्रसार करून इतरही जाती धर्माच्या समाजासाठी काम करीत राहिले.