बडोदा (गुजरात) येथे सुरू,नवसारी, अंकलेश्वर, भरूच, अहमदाबाद इ. सर्वच समाज बांधव एकत्र आलेले होते. व "वधु-वर परिचय मेळावा" व "गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार" असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास खान्देशातुन अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष अण्ण्ण चौधरी, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, चौपड्याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, मढीचे डॉ. जितू चौधरी, मधुकर चौधरी, अनिल पाटील, अहमदाबादचे नारायण चौधरी, इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास बडोद्याच्या खासदार "श्रीमती जयाबेन ठक्कर सुद्धा उपस्थित होत्या व त्यांनी समाजासाठी खासदारनीधी द्यावा अशी विनंती उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, सुभाष अण्णा चौधरी, जीवन चौधरी, बडोद्याचे सुनिल चौधरी, उत्तम श्रावण चौधरी व इतर सर्वच समाज बांधवांनी केली व खान्देशतील विविध ठिकाणी समाज बांधवांनी खासदार-आमदार नीधीतुन कशी मदत मिळाली. याची अनेक उदाहरणे देण्यात आली. व त्यांनाही ती बाब पटली व त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे जाहीर केले की, "बडोदा तेली समाजास मी खासदार निधीतून दहा लाख रूपयाचा निधी मंजूर करते त्यांच्या ह्या उदारतेचे स्वागत समाजबांधवानी उत्स्फीर्तिपणे करून आनंदोत्सव साजरा केला.
गुजरात मध्ये एवढा मोठा समाजाचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या परिपुर्ण केल्याबद्दल समाज बांधवानी त्यांचे कौतुक केले.