महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 ) एप्रिल 2010
मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे. हीच समाजाची प्रतिक आहे. आणि ती आम्ही सावरतो तुम्ही ही होयबा व्हा. असा सल्ला ही दिला. यात काही गरिबांचे वाली म्हणुन घेणारे होते.
काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी मधील ब्राम्हणवादी व जातीवादींचे मिंदे पण.
गेली किती तरी वर्ष आमचे कारभारी बेंबीच्या देठा पासून ओरडतात आमचा वाटा आम्हाला द्या. त्यांचा निवडणूकीत काटा काढला जातो. या बद्दल काडीचे ही प्रबोधन ना कारभाऱ्यात नाही समाज संघटनेत सार्वत्रीक निवडणूकी दरम्यान डरकाळ्या फेडायच्या. समाजाचे मेळावे घेऊन तिकीट मिळवायची आणि एका हाताच्या बोटावर आरमशीर मोजावेत एवढेच निवडून यावेत. यात बदल होत नाही होणार नाही. जो पर्यंत आम्ही बेसावध आहोत आजच्या राजकीय पक्षांचे निरिक्षण केले तर हे सर्व पक्ष एक तर ब्राह्मणवादी मंडळीचे हास्तक आहेत. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, मनासे ही सर्व पाट्या वेगळ्या झेंडे वेगळे मार्ग वेगळे व ठिकाण एकच. ब्राह्मणवादी व जातदांडगे जे आहेत त्यांची सत्ता व त्यांच्या साठी शासन चालविणे. लोकशाही आहे म्हणुन ज्या ज्या ठिकाणी तेली मतदार आहे तेथे तेली उभा करावयाचा जाणिवपुर्वक विरोधक तेलीच ठेवायचा आणि आरामशीर दुसरा निवडून आणावयाचा. ही कुटील निती हे राजकीय लोक अवलंबतात तेली आहे तेथेच आहे. महाराष्ट्रातील तेल्यांचा इतका धसका का घेतला आहे. हे गुपीत नसुन उघड सत्य आहे. जर समजा दहा टक्के तेल्यांचे २०/२५ आमदार निवडून आले तर हे तेली सगळी व्यवस्थाच बदलून टाकतील ती टाकू नये या साठी पद्धतशीर तेल्यांचे खच्चीकरीण सारू आहे. आमचे कारभारी हे जानुन नाहीत हे म्हणने बहुतेक चुक आहे. परंतु मिळालेला लाभ आपल्या पुरता किंवा सोबत्यांना देऊन ते समाधानी आहेत. त्यामुळे सामाजीक जाणीव उणीवात ठेवून आपल्या नेत्यांच्या समोर तोंडावर बोट, हाताची घडी, डोळेबंद आशा अवस्थेत आज्ञा धारक पणे आहेत.