महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 3 ) एप्रिल 2010
तुमचा पक्ष कोणता ? तुमचा नेता कोणता ? या गोष्टीशी आमची बांधीलकी शुन्य कारण तुम्ही सर्व मंडळी तेली म्हणुन जेंव्हा समाज पातळीवर - येता तेंव्हा तेल्यांच्या विकासाच्या गप्पा मारता पण तेल्यांच्या विकासाच्या संधी समोर येतात तेंव्हा तुमच्या पक्ष नेत्या समोर तुम्ही गप्प आसता हे वास्तव तुम्ही किती ही लपवले तर लपत नाही. महिला आरक्षण राज्यसभेत मंजुर झालेच आहे. ते लोकसभेत मंजुर होताना नेमका हावा तो बदल घेणार ही नाही कदाचित - किरकोळ विरोध म्हणुन किरकोळ बदल होतील पण मुळ प्रश्नाला म्हणजे आमच्या लोकसंख्येप्रमाणे महिला आरक्षणात ओबीसी महिलांना राखीव जागा देणार नाहीत ना. भुजबळ साहेबांनी शरद पवारा समोर डरकाळी फोडली की तो शरद निती -प्रमाणे संपविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पंतप्रधानाना पत्रा द्वारे जाणीव करून - दिली या वेळी देशभरातील तैलिकने काय केले ? जर खरो खर साधा पत्रव्यवहार जरी केला आसेल तो तरी समाजासामोर जावु द्या. समाजाला समजु द्या आमच्या - जगण्या मरण्याची तैलिक आहे. आणि जर नुसतेच वधु वर मेळावे भरवुन कोट्यावधी रूपयांची भव्य दिव्य कार्यप्रणाली समाजा समोर ठेवत आसाल तर - आपला समाजाचे हित नेमके कशात आहे. याची कुठेच जाणीव ठेवली नाही ठेवत नाही हे सांगावयास एक समाज बांधव म्हणुन पहिले कर्तव्य आहे. महिला - आरक्षणात माझ्या घरातील कोण आमदार किंवा खासदार होणार नाही एवढा पैसा - ही नाही पण समाजमाता केशर काकु यांच्या नंतर किमान ४/५ आमदार, खासदार तेली महिला होतील हीच एक धडपड. मुळात तुमच्या नेत्या पेक्षा, तुमच्या पक्षा - पेक्षा, समाज हाच मोठा आहे, सच्चा आहे, प्रामाणिक आहे, तुमच्यावर निष्ठा ठेऊन आहे, यासाठी रचनात्मक बांधनी झाली पाहिजे. नाहीतर हाच समाज पायदळी तुडवेल.