एप्रिल 2010, लेखक : श्री. मोहन देशमाने
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले. त्यांच्या भावी पिढ्यांची सोय करावी हा त्यांचा खरा रस्ता होता त्यांच्या दृष्टीने हित चुकले नाही उलट शंभर टक्के नव्हे तर नव्यानव टक्के बरोबर होते. आता राहिला एक टक्का, याच एक टक्यात ते त्यांच्या दृष्टीने चुकले आणि माझी नोंद पुसटशी ठेवली. ती पुसटशी नोंद एक महामार्ग बनवला जाईल हे जर जाणीव आसती तर ही पुसटशी नोंद ठेऊ दिली नसती. आता ही एवढी धडपड का व कश्या साठी केली हे समजणे म्हणजे माझी व देहुच्या संत तुकारामांची वाट खऱ्या अर्थाने समजेल ती समजुन घेणे प्रत्येक मानवाची वाटचाल असावी. महिपतीने लिहून ठेवले चाकणचा संतु तेली देहूच्या तुकोबा बरोबर अभंग लिखानाचे काम करित आसे. याच साठी केली धडपड याच साठी केला होता यज्ञ. याच साठी उभे केले आम्ही युद्ध. याचसाठी किडा मुंगी सारखा मी त्या वेळी तळपता सुर्य झालो. याच साठी त्यांच्या युद्धात पूर्ण तयारीने उतरलो व यश मिळविले. पण त्या नंतर बरेच घडले व आमची संघर्षाची युद्धाची मानव मुक्तीची, देव मुक्तीची लढाई झाकण्याची, झाकळण्याची आडविण्याची फार मोठी कटकारस्थाने झाली. ही लढाई समजुन घेतली तरच पुन्हा इथे मानव मुक्तीची लढाई उभी रहाणार आहे. पुन्हा खऱ्या देवाच्या जवळ जाण्याचा अधीकार मिळणार आहे. नाहीतर फक्त तोंडाने जय संताजी, पुण्यतिथीला उत्सव समजुन आनंद उत्सव साजरा केल्या सारखा आव आनने. फक्त उद्या कोणी तरी हे करावे आणि मी धन्य धन्य व्हावे या साठी मी धडपड केली होती का ? माझे भले मोठे नावं देऊन राष्ट्रव्यापी ते गल्ली पर्यंत संस्था उभाराव्यात. त्या संस्थेच्या मानपानात मला फोटोत थांबवावे लागते. ते सर्व बघावे लागते. काही दिवसा पूर्वीची एक घटना सांगतो मग मला का मांडावे लागत आहे ते सहज समजेल. एका पुण्यतिथीला सात दिवस सप्ताह बसला. पुण्यतिथी दिनी हजारो बांधव भेटून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याचे किर्तन ही झाले. महाप्रसाद ही सर्वांनी खेळीमतेळीत घेतला. आणि दोन प्रहरी मिटींग सुरू झाली अंधार पडला उजेड नाही. जवळच जनरेटर होता. त्यावर उजेडाचे साधन होते. झगमाटात चर्चा सुरू झाली. याला तुम्ही वाद म्हणतात आम्ही त्याला खल म्हणत आसु . या पेक्षा ही तफान खल आम्ही लढत होतो. पण आशय वेगळे होते. मार्ग मानव मुक्तीचा होता. इथे एकचं ध्येय एकच खल होता माझ्या नावे असलेल्या या संस्थेच्या अध्यक्ष स्थानी कोण असावा. हा मोठा फरक आहे. आमचे खल व यांचे वाद या मध्ये आता या गोष्टीत मला रस नाही. इकडे हे खल कधी गोडीत कधी ऐकामेकाची कॉलर पकडू पहाता कधी मर्यादा सोडुन शब्द प्रयोग सुरू होते. वाद होता. इथे पुढारी कोण असावा. इकडे लाईटच्या फोकस पण माझ्या समाधी मंदिरात अंधार पडून दहा पाच मिनीटे होताच त्या कल्लोळात कोपऱ्यात असलेल्या बांधवाला माझी आठवण झाली आणि त्याने समई पेटवली. तो बापडा मंदिरात विठ्ठलाचे नाव घेत बसला. त्याला या असल्या खलात रस नव्हता. आणि मला आमच्या काळातील खलात रस होता. बंदिस्त केलेला देव सोडविण्याचा देवाच्या दारात समता निर्माण करण्याचा. वेद त्यांनीच वाचावे, ऐकावेत यासाठी गर्वीष्ट झालेल्यांच्या मान झुकविण्यासाठी आम्ही खल करित होतो. ते दांभिक होते. ते फसवत होते. ते लबाड होते. ते देव सांगतो म्हणत म्हणत देवच दडवत होते. यासाठी आम्ही खल करित होते. आशा खलात पुढार पण नको होते. तुकोबाराय, मी नामाजी माळी, गवार शेठ ही सगळी जन्माने शुद्र ठरवलेली फक्त कडुसकर तेवढे ब्राह्मण. आम्ही पुढारी नव्हतो. आमच्या घरी सात पिड्या कोणी विद्वान नव्हता फक्त होती विठ्ठलाची भक्ती. ही भक्ती संत नामदेवांनी आम्हाला शिकवली होती. विठ्ठलाची भक्ती हीच फक्त आमची ठेव होती. आणि ती घेऊन आम्ही उभे राहिलो एक युद्ध जिंकले. ते जिंकलेले युद्ध शब्द रूपात ठेवले. ही ऐतिहासिक कामगिरी एवढीच केली हे सांगणे, पटविणे, लिहणे, वाचणे मुळात चुक आहे. .
तुका म्हणे नाश केला । विंटबिला वेश जेणें ॥
तुकोबाराय तर ठणकावुन सांगत आरे तुम्ही जो वेद म्हणता हे आसले वेद आम्हाला वाचण्याचा, ऐकण्याचा अधीकार ही नव्हता. पण रोजच्या जगण्यात, रोजच्या दडपशाहीत आम्ही उभे राहिलो. कारण सत्य हे दुर लोटले होते. जे सत्य नामदेवांनी मी मी म्हणनारांच्या छाताडावर उभे राहुन बिंबावले. त्या नामदेवांनी तुकोबांना स्वप्नात सांगितले आणि आम्ही नामदेवांना गुरू मानुन वाटचाल सुरू केली. संत नामदेव उभे राहिले एक समता निर्माण करावयास त्यांनी समता निर्माण केली. चोखोबा सारख्या महाराला मानाने सन्मानाने पंढरपुरच्या पहिल्या पायरीचा मान दिला. गोरा कुंभार, सेना नाव्ही नरहरी सोनार, जोगा परमानंद, सावता माळी. त्या त्या जातीत तेंव्हा पायदळी तुडवल्या जाणाऱ्या समाजाचे ते प्रतिनिधी होते. संत ज्ञानेश्वर इकडे समाधी घेतात त्याच वेळी देवाच्या नावावर जगणारे उध्वस्त होतात. हा योग नाही संत नामदेवांनी पैठण सारख्या ठिकाणी केंद्र म्हणुन काम करणाऱ्या सांस्कृतीक दहशदवादा विरोधात एक जनसमुदाय उभा केला. त्यांनी विठ्ठलला आपला मानला भात, मतभेद, श्रींमत गरिब ही दडपशाही त्यांनी झीडकारली. मानव मुक्तीचा मार्ग दिला. हा मार्ग पुन्हा शेकडो वर्षांनी संपविला होता. पुर्वी तेली ज्या बौद्ध धर्मो होते त्या काळात ते राजे होते. ते विद्वान होते, ते धनवान होते, ते न्याय देणारे होते, ते राज्य चालवणारे होते ते धर्म प्रसारक होते. बौद्ध धर्माचा ठेवा पंढरपुरात होता. भक्ती करून व मानवता रूपाने तो बौद्ध विचाराचा होता. तो ठेवा आडगळीत होता. तो ठेवा आपला मानुन नामदेवांनी इथे समता आणली. पण नंतर हे समतेचे चाक उलट्या दिशेने फिरवीले गेले. इथे देवाचे ठेकेदार पोळत होते इथे राज्य करणारे पोळत होते. या मंडळीनी खरा नाश केला होता. या मंडळींनी आपल्या सोईंचा देव बनविला होता. समता नको होती. जो तेली राजा होता जो तेली विद्वान होता. जो तेली जगभर फिरत होता. जो तेली औद्योगीक क्रांतीचा आधार स्तंभ होता. जो तेली कुशल पणे राज्यकारभार चालवू शकत होता. त्या तेल्याला या व्यवस्थेने गलित गात्र केले होते. त्याला द्रव्य मिळविण्याचा अधीकार चिंचोळा होता त्याला द्रव्य साठविण्याचा अधिकार नाकारला होता. बौद्ध काळात हे राजे होते. म्हणुन यांना क्षेत्रीय पद नव्हते. क्षत्रियत्व लयास गेले हा कलंक लावुन. जे आपले सोईचे आशाना क्षत्रीय पद दिले जावु लागले. यातुन तेली शुद्र ठरविला यातुन तेल्याला शारीरीक कष्टाची कामे करण्याची जबरदस्ती केली. यातुनच त्याची विचार करण्याची सत्या जवळ जाण्याची उमेद मुळा सहित उपट्रन टाकली. आशा या तेली समाजातील मी एक घटक. मी उभा राहिलो. तय्याला हे कारण. मला जरूर देव हवा होता. मला समता हवी होती.* आणि या समतेसाठी मी चाकण वरून सुदुंबरे, देहु, लोहगांव, पुणे इथे तुकोबा बरोबर जात होतो. ही लढाई दिसते तेवढी सोपी नव्हती. ज्या समुहातुन आम्ही आलो होतो ते सर्व समाज शुद्र म्हणुन हिणवले ले त्यांच्यातील उर्मी कोमजुन टाकलेल्या, जगण्यांची फक्त धडपड मंद अग्नीवर ठेवलेली. आशा वेळी निश्चीत विचार झाला. जे सांगायचे ते पोपटपंची नव्हे. जे करावयाचे ते आपल्या साठी नव्हे. जे बोलक्याचे ते प्रथम आपल्या रोजच्या जगण्यात प्रतिबिंब उमटलेले असावी. तुकोबांनी आपल्या घरची सावकारी कागद पत्रे नदीत बुडवली. आणि मी सुद्धा जगण्या पुरते मिळवावे. बाकी सर्व दुसऱ्या साठी करावे. बैलाचा घाणा हाकता हाकता बाजार हाट करता करता माझा मी नवा रस्ता निर्माण केला. माणुस म्हणुन घडू लागलो. खरा माणुस खरा देव शोधु लागलो, पहिला संसार पाहण्यास शिकलो घडु लागलो. खरा डोळस झालो. डोळे सर्वांना असतात. सुर्य प्रकाश जसा शेवटच्या टोका पर्यंत जातो तसे सुर्य प्रकाशाला भेदा भेद नसतो तसे डोळे उघडल्यावर नजर जाईल त्या ठिकाणा पर्यंत जे आहे ते दिसते. त्या दिसण्यातला खोटे पणा दिसण्यातलीलबाडी दिसण्यातली भेदूगीरी, दिसण्यातली लपवेगीरी. खऱ्या अर्थाने मानवता ही समजु लागली. याच भक्कम आशा विचारावर पुढेच महायुद्ध लढु शकलो.
आमच्या बरोबर संघर्ष त्यांना परवडणारा नव्हता.
तुकाराम काय किंवा मी काय ? शुद्र ठरविलेले. वेद आमच्या साठी नव्हते राज्य कारभार आमच्या कडे नव्हता. न्याय निवाडा आमच्याकडे नव्हता. आम्ही कष्टकरी आम्हाला तो अधिकार इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. या बद्दल बोलाल तर शिक्षा ही त्यांनी तयार केलेल्या धर्मग्रंथाच्या पाना पानात लिहिली होती. त्यामुळे शेकडो वर्ष आमच्या घराण्यात हे अधीकार नव्हते. आम्हाला हे अधीकार दिले नाहीत याचा सार्थ अभिमान वाटत होता. कारण त्या काळी हे अधीकार ज्यांना होते ती मंडळी गर्वाने मातली होती. मानवता तुडवत होती. हे काम आम्ही अंत्यजाचे म्हणजे हिन माणसाचे मानत होतो. यातुन देवाला ही अंधारात ठेवुन मग्रुरूरी माजली होती. धर्माच्या नावा खाली अन्याय, शोषण नितीचे लक्तरे वेशीवर टांगली जात होती. तेली, कुणबी, माळी या सारख्या जाती फसवल्या जात होत्या राजरोस प्रतिष्ठीत पणे त्यांना भरडले जात होते. हे रंजलेले, गांजलेले जात समुह आपल्या पोटात संत नामदेवारंना जपुन होते. पैठणच्या हेमांड व बोपदेव या दहशदवाद्यांच्या विरोधात लढणारे नामदेव हवे हवे वाटत होते. राज सत्ता कोणाची आहे हे गौन समजुन आमची धर्म सत्ता अबाधीत राहिली पाहिजे या साठी दबाव तंत्र अवलंबणारे होते. आन्यायाला गर्वाने प्रतिष्ठा समजणारे सर्व बाबतीत अबाधित होते. तर त्या विरूद्ध आम्हाला शुद्र ठरवुन पिड्यान पिड्या बाधीत केलेले होते. आमच्याकडे दया होती. आमच्याकडे दांभीक पणा नव्हता. समाजाच्या जगण्याचा एक घटक असल्याने आमच्याकडे सत्य होते. आमच्या जवळ राजकीय व धार्मीक सत्ता जरूर नव्हती पण विठ्ठलाच्या दारातल्या समतेचे आम्ही वारसदार होतो. हा वारसा हीच आमची ताकद होती. ही ताकद नाठाळ मंडळींना वटणीवर आणनारी होती. सर्वस्व हिसकावल्या गेलेल्या समाजातील रंजल्या गांजल्या समुहाला जगण्याची नवी उमेद देण्याचे बळ आमच्याकडे होते. समाज जीवनात संसार चालविताना तुकोबाराया बरोबर असताना मला या बाबच चिंतन करता आले. सत्या जवळ जाता आले. भक्ती अंतरंगात रूजवता आली. मानवता उभी करण्याचे मार्ग मिळू लागले. आम्हाला किर्ती, पैसा, राज्य, वैभव मिळवायचे नव्हते किंवा पिड्यान पिड्या आहे ते टिकवायचे नव्हते तर आम्हाला पायदळी तुडवणाऱ्यांना वटणीवर आणावयाचे होते. संत तुकोबांना किंवा मला कोणत्याही असाह्यातुन संसार पासुन दुर जावे लागले नव्हते मी ही तुकोबा गत नेटका संसार करीत होतोच. पण आम्ही एक साधन जवळ केले. किर्तान संत नामदेव जेंव्हा देवा विषयी, समते विषयी काही सांगु लागले तेंव्हा त्यांना देवळात नव्हे तर देवाच्या मागच्या बाजुला किर्तन करावे लागे. त्यांना किर्तन हे माध्यम माहित होते. या किर्तनातुन समाज घडेल. या किर्तनातुन तो समता म्हणजे काय शिकेल. या किर्तनातुन तो माणुस घडेल. या किर्तनातून तो हाक्क मागेल.या किर्तनातन समता निर्माण होईल. हे किर्तन नामदेवांचे होते. हे किर्तन हेच आमचे शस्त्र होते. आणि म्हणुन खल करणाऱ्यांना समजले नाही आमच्या बरोबर संघर्ष करणे त्यांना परवडणारे नव्हते. जड जाणारे होते.
गोड बोलुन लुटणाऱ्यांच्या बापाचे बाप.
अशाच एका किर्तनात तुकोबारायांनी एक असुड हाणला.
अभत्त. ब्राम्हण जळो त्यांचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उमयता कुळ याती ।।२।।
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी। नव्हें माझी वाणी पदरींची ।।३।।
तुका म्हणे आणी लागो थोरपणा । दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ।।४।।
खरच सांगतो आम्ही समाजाला लुटणाऱ्या मंडळींच्या बापाचे बाप झालो. त्यांच्या हिकमती त्यांच्या लबाड्या चव्हाट्यावर आणल्या. आता आम्ही तेरा जण काही ठरवुण एकत्र आलो नव्हतो. रक्ताच्या नात्याचे नव्हतो. एकमेकाच्या गोत्याचे नव्हतो. ब्राह्मण व शुद्र याच फक्त दोन जाती त्या वेळी अस्तीवात होत्या. राज्यकर्ता जवळ सत्ता मिळविणे टिकवणे व वतने वाढविणे यात जे होते त्यातील ही कोण नव्हतो. म्हणुन आमच्या तेरा जणात कुणबी होते. बलुतेदार होते, व्यापार करणारे होते. आणि ब्राह्मण ही होते. म्हणजे आमचा लढा हा सत्य व असत्याचा होता.
लेखक : श्री. मोहन देशमाने