तेली गल्ली, एप्रिल 2010
पुणे - तिळवण तेली समाज संस्था भवानी पेठ पुणे या संस्थेची निवडणूक डिसेंबर २००८ मध्ये झाली होती. यावेळी परिवर्तन पॅनेलचे १५ जन बहुमताने निवडुन आले. पहिल्या प्रथम श्री. रामदास धोत्रे संस्था अध्यक्ष झाले. त्यांनी पुर्वी ठरल्या प्रमाणे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा समाज विश्वस्ता कडे जमा केला. त्या नंतर १५ सदस्यांच्या मिटींग मध्ये श्री. संजय दत्तात्रय भगत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. उपाध्यक्ष :श्री. संजय राधाकिसन व्हावळ, उपाध्यक्ष - श्री. विजयकुमार लक्ष्मण शिंदे, कार्याध्यक्ष अजय बबनराव शिंदे, सचिव - श्री. अशोक बबनराव सोनवणे, अंतर्गत तपासणीस - श्री. रमेश सदाशिव भोज, वधु -वर सुचक प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) पुरूषोत्तम व्हावळ यांची निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्षांना मावळते अध्यक्ष श्री. रामदास धोत्रे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. श्री. संजय भगत यांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले माझा अध्यक्षपदाचा काळ अल्प असला तरी मी विकासाच्या कल्पना ज्या आहेत त्या सुरू ठेऊन नविन गोष्टी समाज हिताच्या राबवत आहे. कै. दादा भगत हे सुमारे २५ वर्षा पूर्वी अध्यक्ष होते. त्यांच्या नंतर दिर्घ काळाने भगत घराण्याकडे सत्ता आली आहे. त्याचे मी चिज करेन हे ही स्पष्ट केले. सर्व निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वा तर्फे अभिनंदन.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade