नाशिक मालेगांव :- शासकिय सेवेत राहुन समासेवा हा श्वास बनलेल्या कर्चचार्याची सेवा सदैव स्मरणात राहते. मालेगाव बीएसएनएलची सेवा ग्राहकाभिमुख करण्यात रमेश उचित यांचा सिंहाचा वाटा आहे. मालेगावची साहित्य चळवळ त्यांच्यामुळे गतीमान झाली. मालेगावकर त्यांच्या सेवेची जरूर नोंद ठवतील असे उद्गार महाराष्ट्राचे सहार राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी काढले.
येथिल कृष्णा लॉन्स सभागृहात रमेश उचित यांचा नागरी सत्कार पार पडला त्याप्रसंगी प्रमुख पाहणे म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे मंडल अभियंता अशोक गायकवाड होते.
प्रारंभी संताजी ब्रिगेड, कॉम्प सर्वाजनिक वाचनालय, ओबीसी सेवा संघ, लाक समिती, बीएसएनएल कर्मचारी संघटना, माजी विद्यार्थी संघटना मालगाव मराठी प्रसार चळवळ आदी संघटनांच्या वतीने श्री. रमेश उचित व सौ. अरूणा उचित यांना मानपत्र, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार भगवान बागुल, प्रा. संताजी बावस्कर, डॉ. एस. के पाटील, कवि राजेश जाधव, बीएसएनएलचे सलीम शेख दिलीप पाटणकर, संजय पांडे, प्राक्ता उचित आदींचे गौरवपर भाषणे झाली.