श्री. संताजी ब्रिगेड पुणे जिल्हयाच्या वतीने समाजातील उच्चशिक्षीत मुलामुलींना श्री. संताजी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
श्री. संताजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने समाजातील उच्च शिक्षीत डॉक्टर, वकील, इंजिनियर, पोलिस खाते, शासकीय अधिकारी तसेच समाजासाठी योगदान दिलेल्या जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार सोहळा नुकताच पुणे येथे पार पडला एक प्रकारचे वधुवर मेळाव्याचे स्वरुपच या कार्यक्रमाला आले होते. सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते. समाजातील अनेक उच्चशिक्षीत मुले मुली वधु वर मेळाव्याखेरीज प्रकाशात येत नव्हती परंतु श्री संताजी ब्रिगेड च्या माध्यमातुन हा कार्यक्रम घेतला गेला आणि पुन्हा एकदा मुलामलींना स्वत:साठी जोडीदार निवडण्याची सधी मिळाली आणि पुन्हा दोन्ही कटुंबाचा परिचय झाला आशा प्रकारे ह्या सर्वांना श्री. संताजी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजासाठी योगदान दिलेल्या समाज बंधुनांही या वेळीेस संताजी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल. या वेळेस तिळवण तेली 82 भवानी पेठचे पुणे शहराचे मा. विश्वस्त श्री. ताराचंदजी देवराय, वधु वर कमिटीचे पुणे शहराचे अध्यक्ष श्री. शामराव भगत, काळुराम सायकर, जयपपा शिंदे टि. व्ही. सिरयल व सिने अभिनेते श्री. दत्तात्रेय उबाळे, माधवराव राऊत यांना विशेष सत्काराने सन्मानिकत करण्यात आले. या सर्व समाज बांधवाचे पुणे शहरात समाजासाठी फार मोठे मोलाचे योगदान आहे. श्री. संताजी ब्रिगेड हि संस्था 5 जुलै 2015 रोजी संकाष्टी चतुर्थी च्या दिवशी स्थापन झाली या संस्थेचा हा पहिलाच कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा झाला.
समजसेवेचं व्रत घेवुनच हे सर्व कार्यकर्ते कामाला लागले नाहितर येथे कोणाला वेळ आहे लष्कराच्या भाकरी भाजून स्वत:चे हात पोळुन घ्यायचे परंतु तसे नाही समाजाचे आपण काही तरी देणे लागतो. समाजासाठी आपण काहितरी केले पाहिजे हि भावना मनात ठेवुनच संताजी ब्रिगेडच्या दोन शाखा महाराष्ट्रात ओपन झाल्या आणी पुढील काळात अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संताजी ब्रिगेडच्या शाखा ओपन करन समाजाला एक प्रकारचा पर्याय उपलब्ध करून देणार असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी व्यक्त केले, या प्रसंगी अॅड. विपीन कामडी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सिने अभिनेत दत्तात्रेय उबाळे यांनी आपले बांधवासाठी हि संस्था काम करणार आसुन गरिब महिला भगिनींसाठी हि संस्था काम करणार असुन गरिब महिला भगिनींसाठी मोफत शिलाई मशिन वाटप करण्याचा संकल्प संस्थेच पुणे जिल्हा सचिव श्री. दिलीपराव शिंदे यांनी व्यक्त केला. समाजातील घटस्फोटाचे प्रमाण कमी करूण दोन्ही परिवारामध्ये समेट घडवुन आणण्याच काम संताजी ब्रिगेडच करेल हे मत संस्थेचे पुणे शहर अध्यक्ष श्री. संतोष व्हावळ यांनी व्यक्त केले प्रत्येक महिण्यात चार ते पाच शाखा ओपण झाल्याच पाहिजेत असा चंगच संस्थेचे उपाध्यक्ष महेश अंबिके पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रितम शेठ केदारी प्रसिद्धी प्रमुख सुर्यकांत बारमुख यांनी बांधला आहे आणि या सर्वांना मार्गदर्शन करण्याचे काम संताजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष श्री. विजयरावजी रत्नपारखी यांनी केले असुन कार्याक्रमाचे सुत्रंचालन हरिष देशमाने यांनी केले तर प्रास्ताविक दिलीपराव शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शनाचे सुंदर काम महेश अंबके यांनी पार पाडले या कार्यक्रमाचे नियोजनाचे काम संताजी ब्रिगेडच्या सर्वच पदाधिकार्यांचे होते त्यामध्ये गणेश चव्हाण सौ. राधिका मखामले यांचाही सहभाग. शेवटी मधुर भोजनाने कार्यकमाची सांगता झाली.