पुणे :- लोकसभा निवडणुकी पुर्वी महाराष्ठ्राच्या तेली समाजाचे पालनकर्ते, सरंक्षण कर्ते, उद्धार कर्ते म्हणुन मिरवणार्या बर्याच कर्त्या मंडळींनी बारामतीकरांच्या मराठी- कुणबी यावाटचालीला लाथ न मारता. त्या विषयी आजपर्यंत कुठे साधा विरोध न करता मोदीचे तेली जन्मावर निष्ठा ओतुन नागपुरच्या ब्राह्मण शाहीला आपले माणुन मोदींना 12 टक्के समाजाचा जाहिर पाठिंबा दिला. मागणी काहीच नाही, अटी काहीच नाही. समाजाला काही देऊ नका. पण तुम्ही तेली अहात मग आमचा तुम्हाला पाठिंबा देऊ केला होता. पदरात काय तर शुन्य यापासुन काहीच न शिकलेले जे आहेत तेच आमचे कर्ते करवीते आहेत. एक खासदार, तिन आमदार व एक मंत्री या तुकड्यावर समाधान राहुन. मागील प्रमाणेच एका नव्या आणिबाणीला रूजवण्याचे शिल्पकार आहोत की नाही हे आता काळ ठरवत आहे.
कारण आज नवी आणीबाणी सुरु आहे. त्याचा विचार डोक्यात येऊ नये इतकी दहशत देशात सुरू आहे. गुलामगीरीचा सुवर्ण काळ उध्वस्त करणारे संत नामदेव, चक्रर स्वामी होते. परंतु गुलामगीरी नष्ट करू पहाणार्या व करणार्या या मंडळींना ब्राह्मणीव्यवस्थेने त्यांना नष्ट केले. व पुढे शेकडो वर्ष समता मागणारे तयार होऊ नयेत एवढी दहशत निर्माण केली. आज तेच सुर आहे. ब्राह्मणशाहीने छ. शिवरायांचा डाव्या पायाच्या अगड्याने कुंकूम टिलक लावला हे उजेडात आणनारे पानसरे जन्माने ब्राह्मण होते. परंतु सत्य, समता व स्वातंत्र्य विचारांचे होते. जो जो समता मागेल जो जो सत्य मांडेल त्याला त्याच्या सह समता संपवणे ही आजची नवी आणाीबाणाी देशत मोदींच्या पंखाखाली वावरत आहे. ज्या नागपूरच्या भागवतांच्या विचारावर. त्यांच्या रिमोट वरती मोदी वावरतात त्या भागवतांनी एक डाव सुरू केला आहे. पुर्वी हे आरक्षणाला विरोध पडद्यायातुन करीत. पण आज त्यांनी हे आरक्षण संपवुन टाका अशी त्यांच्याप्रमाणे दिशा दिली आहे. ते सहज संपणार नाही या साठी अनेक संबंधीत वातावरण निर्माण केले आहे. हे निर्माण करण्याचे कामच आज मोंदीना पंतप्रधान करुन जोमाने सुरू आहे. त्यांना या देशाची राज्य घटनाच मान्य नसावी इतकी वातावरण निर्मीती होत आहे.
मी आपण जन्माने सर्वच हिंद आहोत. जन्मल्या पासुन मरे पर्यंत या धर्माचे बांधील आहोत तेली समाज लोकसंख्येच्या 12 टक्के आहे. काँग्रेस प्रणालीने काहीच दिले नाही हे ही वास्तव आहे. एक तेली पंतप्रधान हा किती तो मोठा आपण अभिमान बाळगला. आणी त्या पाठीमागे दडलेला भस्मासुर आपण कवटाळुन बसलो. हा आजचा उन्माद आपण पाहून पहात नसल्या सारखे करुन तोच ढोल वाजवत बसलो आहोत. हे ही सत्य नाकारतो तेंव्हा एक सांगावेलागेल. पवारा सहीत काँग्रेसने मराठा - कुणबी ही साडेसाती देऊन टाकली तेंव्हा आपण गप्पच बसलो. आता ही आपण गप्पच बसणार यातच समाज हित मानत रहाणार हीच ती दुसरी आणीबाणी तिचे आपण पाठीराखे आहोत का हा प्रश्न विचारणे हे ही स्वातंत्र्य हिरावुन घेतले आहे.
मी तेली आहे मी हिंदू आहे. मी जनमा पासुन मरे पर्यंत कधी खुशीने कधी समाज समुहा बरोबर रहाण्यासाठी हिंदू धर्माचे रिती रिवाज पाळतोच हिंदू धर्मातल्या विशिष्ट जाती वर्गाच्या दहशदवादी कार्यवाही विषयी रोख ठोक मांडतोही बर्याच हिंदू धर्म शास्त्राच वाचन करुन धर्मशाास्त्रे ही समजुन घेतली. कारण आईने यातना सहन करून जन्म दिला. आईने हालअपेष्टा सहन करुन वाढवले. आईनेच लिहीता वाचता शिकवले आईनेच संस्काराची शिदोरी दिली. या जगात सर्वश्रेष्ठ प्रत्येकालाच प्रत्येकाची आई आसते आणी ती आसावी कारण माझी ही एक आई होती अंगठे बहाद्दुर परंतु कळु लागले तेंव्हा मी लिहील्या लेखानाची तीच पहीली साक्षीदार होती. कारण आई कशी असावी हे पाऊलो पावली हिंदू धर्म संस्कार देते. परंतु कोणत्याही धर्म ग्रंथात तु तुझ्या आईला झटकुन टाक तुझ्या आईला आई म्हणु नकोस तु तुझ्या आईला लेकीची माया देऊ नकोस हे कुठे सांगतिले नाही. परंतू फाटकया आभाळाला टाके देत बारामतीच्या चिंचकरांनी वाढवले आईने खनावळीच्या चपत्या लाटुन मुलीला लहानाचे मोठे केले. मुलगी सदज्ञान होते आणी खानावळीत येणार्या लोकांच्या धर्म विचारात गुंतते आणी तिला आई वडिल नको वाटतात ती घर सोडुन जाते. एवढेच नव्हे तर तीची भेट ही करू देत नसतील. हा कोणता हिंदू धर्म हा कोणता हिंदू धर्माचा संस्कार हि कोणत्या हिंदु धर्माची संस्कृती ही मध्ययुगीन काळातील गुलामगीरी असावी का ? त्या वेळी गुलामगीरी लादण्या पुर्वी अशीच समाज व्यवस्था वैचारीक स्वातंत्र्य पासुन दुर ठेवण्याची निर्मीती केली होती.
आशा आणीबाणीला, गुलामगीरीला कर्ती माणसे जाणते पणी आपल्या सहीत समाजाला कवटाळुन असतील तर संत संताजींनी जो सामाजीक उठाव केला तो एक तर खोटा किंवा यांची ही ----गीरी खोटी आहे.