प्रेस लाईन त्यावेळी ट्रेडल मशीनची होती. खिळे जुळवणे हा एक महत्वाचा कामगार होता. श्री. दत्तात्रय शेडगे कमी शिक्षणावर कंपोर्झटरचे काम शिकले. सातार्या जवळच्या लिंब गावात आपले कुटूंब ठेवून रोज साताराला प्रेस मध्ये जावु लागले. खिळे जुळवता मशीन चालवु लागले. जे नव ते शिकावे बारकावे टिपावेत स्वत: समजुन घ्यावे यातुन ते प्रेसचा व्यवहार समजुन घेत होते. आता कामगार न रहाता मालक बनु पुणे बेंगलोर रस्त्यावर पाचवड हे व्यापारी पेठ पेक्षा मोक्याचे ठिकाण या ठिकाणी हाम रस्त्या लगत असलेलया घरांचा उकीरंडा यात आजुबाजुचे लोक पालपाचोळा व कचरा टाकत. ही जागा भाडे तत्वावर घेऊन पत्र्यांचे शेड उभे करून श्री. शेडग्यांनी जुनी मशीन घेऊन आपला उद्योग सुर केला. गिर्हाईक नाही आसे ही दिवस जावु लागले परंतु सासरे प्राथमीक शिक्षक होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ओळखी निर्माण केल्या शालेय प्रश्न पत्रीका पेपर, संघटनेची कामे मिळू लागली. या कामावर लक्ष केंद्रीत करताच व्यवसायाला गती आली. त्यामुळे बाहेरील कामे ही मिळू लागली समाज बांधवांना बरोबर जिव्हाळ्याचे व सामाजीक संबंध ठेवल्या कारणाने किमान 20 कि.मीचा बांधव काम देत असे. व्यवसायाला गती आली परंतु गावाकडे म्हणजे पौंड येथे वडिल वयोवद्ध झालेले. घरच्या जबाबदार्या वाढल्या तेंव्हा हा सर्व व्यवसायाच पौंड येथे घेऊन जावयाचे ठरवले.
पुन्हा ही एक मोठी जोखीम स्विकारण्याची वेळ आली. पौंड तसे जन्मगाव इथे पहिले व्यवसायीक रूळले होते. त्यात आपली एकभर म्हणजे व्यवसायाची ओढातान सुर होणार. तहसील कार्यालया समोर एक भाड्याची खोली हुडकली या जागेत प्रेस सुर केली याच जोडीला एक झेरॉक्स मशीन ही घेतली शांत व मृद बोलणे. हे समोरच्याला आपले म्हणावयास भाग पाडत होते. यातुन पुन्हा व्यवसाय उभा करू लागले. छापाई कामा बरोबरच झेरॉक्स कामाला घरची माणसे कमी पडू लागली ज्या जागेवर व्यवसाय सुर केला तीच मोक्याची जागा खरेदी केली. बदलते तंत्रज्ञान आत्मसाथ केले तर व्यवसाय होऊ शकतो त्या तंत्रज्ञानाला आर्थिक पाठबळ ही जवळ ठेवावे लागते. हे गणित जमले तरच व्यवसाय आपला रहातो हे शेडगे यांनी सिद्ध केले. त्यामुळे पौड सारख्या तालुक्याच्या पण खेडेगावात फेलेक्स मशिन सुरू केली. या क्षेत्रात ही आपला जम बसवला. हा जम बसवताना स्वत:पुरते न पहाता या व्यवसायाशी संबंधीत बांधवांना ही उभे केले. काहींना आपल्या बरोबर ही ठेवले आणि मुळशी तालुक्यात एक विश्वास निर्माण केला एक कंपोझीट, एक प्रिंटर होता होता प्रेस सुरु करणारे शेडगे आज यशस्वी उद्योजक तयार झाले हे करताना त्यांचा मुलगा, सुन व पत्नी यांची साथ ही मोलाची आहे हा आदर्श समाजा समोर आहे.