तिळवण तेली समाजातील नगर जिल्ह्यातील पहिले डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झालेले थोर समाज सेवक डॉ एस. टी. महाले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती खाली देत आहोत.
डॉ. एस. टी. महाले यांचा जन्म १४ मे १९२५ रोजी सिन्नर जिल्हा नाशिक येथोल दापूर या गावात एका सामान्य तेली कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर व नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झाले. शिक्षण चालू असतानाच व बाह्य जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉक्टराचे वडील ते ११ वर्षांचे असताना वारले.
तर घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतांना हट्टी डॉक्टरानी लोकाकडे काम करुन आपले शिक्षण चालू ठेवले. संगमनेर येथील राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. प. पुज्य साने गुरुजी यांची व्याख्याने व कै. श्री. भास्करराव दुर्वे यांच्या प्रेरणेने त्यांचे राष्ट्रसेवा दलाच्या कामाकडे अधिकच वेळ जावू लागला त्यांची निष्ठा व कष्ट पाहून ते संगमनेर शाखेचे अधिकारी झाले.
राष्ट्र प्रेमाने प्रेरित झालेले डॉ. स्वातंत्र लढ्यात पडले. इंग्रजा विरुद्ध बुलेटिन काढणे व त्याचे वाटप करणे हे काम त्यांनी केले म्हणून १९४२ साली त्यांना अटक करुन त्यांच्यावर खटले भरण्यात आले. खटल्यात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. नाशिक रोड जेल मध्ये त्यांनी शिक्षा भोगली.
१२९ व्या कलमाखाली २ महिने पोलीस कस्टडीत काढले. त्यावेळी त्याचा पोलीसानी अनेक प्रकारे छळ केला. पोलीसाच्या तावडीतून सुटल्यानंतर डॉक्टरानी जोमाने राष्ट्र सेवा दलाचे काम पुन्हा सुरु केले. म्हणून त्यांना राजूर येथे अटक करण्यात आली. त्यांना एकूण चार वेळा अटक करण्यात आली.
राष्ट्र सेवा दलाचे काम करीत असतानाच डॉक्टरानी आपले शिक्षण चालू ठेवले. नगर येथील आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळवून डॉक्टरकीचे शिक्षण सुरु केले. त्याच बरोबर राष्ट्र सेवा दल, काँग्रेस समाजवादी पक्ष व विद्यार्थी स्टुडटस् काँग्रेसचे काम सुरु करुन विविध चळवळीत हिरीळोने भाग घेतला.
१९४८ साली डॉक्टरानी काँग्रेस मधुन बाहेर पडून सोशालिस्ट पार्टीचे व नंतर प्रजा सोशालिस्ट पार्टीचे काम केले.
डॉक्टरी पदवी संपादन केल्या नंतर डॉक्टरने आपला व्यवसाय नगरला सरु केला. जुना कापड बाजार व रंगार गल्लीत त्यांचा दवाखाना आहे. पैशाकडे न पाहता जनतेची सेवा करणे हे डॉक्टराचे ध्येय असल्याने अनेकांची मने त्यांनी जिकली.
जाती ने तेली असून देखील कधीही तेलाचा घाणा हाती न घेतलेल्या डॉक्टर महाले खादी ग्रामोद्योगच्या सहकाराने तेली समाजाची सहकारी तेल घाणी सोसायटी स्थापन करण्यात पुढाकार घेवून त्या सहकारी सोसायटीचे चेअरमन पद २० ते २१ वर्ष भूषवित आहेत.
सोसायटीच्या सभासदाकरिता त्यांनी क्रेडीटवर करडो पोती गळीता साठी दिले. त्याचे काही सभासदानी पैसे थकबाकी केली परत ६-६ पोते क्रेडिटवर गळीतासाठी देण्यात आली. परंतु त्यांचे तळमळीचा सभासदानी फायदा उचलला नाही.
सन १९७४-७५ मध्ये स्टेट बँकेकडून ग्रुप सिस्टीमवर सभासदाना प्रत्येकी रुपये २००० धंद्या करिता वैयक्तीक मेहनत घेऊन कर्जाची व्यवस्था केली व त्या सर्व सभासदांना त्यांनी फेडीची गॅरटी दिली. त्या व्यवहारांत त्यांना काही सभासदाचे पैसे भरावे लागले.
काही सभासदाचे त्याचेवर अतोनात प्रेम आहे. त्याचे उदाहरण म्हणजे त्यांना सन १९७१-७२ ला अहमदनगर डि. से को. ऑप. बँक लि. चे डायरेक्टर बोर्डची निवडणक लढवावयाची होती. त्यावेळी ते सोसायटीचे चेअरमन होते. व सोसायटी बँकेची रक्कम रुपये १०,००० ने थकबाकीदार होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीस उभे रहाता येत नव्हते. ते सभासदाना कळाले. कै. श्ंकरराव म्हस्के यांनी सोसायटीमध़्ये येउन चौकशी केली. व निवडणुकीचे कागदपत्र तयार करा मी 10000 चा भरणा बॅंकेत भरण्याची सोय करतो त्याप्रमाणे त्यांनी रकमेचा भरणा केला. यावरून सभसदाचे त्यांचे वर किती प्रेम आहे हे कळुन येते.
तसाच त्यांचा सोसायटीचे कर्मचार्यावर एवढा विश्वास दांडगा आहे. तो असा आणीबाणीत त्यांना स्थानबद्ध करुन नाशिक येथे ठेवले त्यावेळी ते संस्थेच चेअरमन होते. सोयायटीची अडचण होऊ नये म्हणन त्यांनी सेक्रेटरी बोलावुन संपूर्ण चेकबुकावर सह्या करुन दिल्या व तसेच करडीचा बॅंके मार्फत साठा कर्जाचा व्यवहार होता. सभासदांची अडचण होऊ नये म्हणुन त्यांना डिलीव्हरी फॉर्मवर व कस्टडी फॉर्मवर सह्या करून दिल्या या वरून त्यांचा कर्मचार्यावर किती दांडगा विश्वास आहे हे सिद्ध होते.
सोसायटीच्या अनेक अडचणीच्या वेळी ते स्वत: झीज सोसून मदत करीत आहेत व डॉक्टरी व्यवसाय सोडूनही कामाचे वेळी नेहमी हजर असतात. त्या मुळे आज सोसायटी २७ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे संस्थेचे काम हे घरचेच काम आहे असे समजून ते नेहमी सातत्याने सोसायटीच्या उत्कर्षासाठी झटत आहेत.
त्यांचे ६१ व्या वर्षाच्या पदार्पणावेळी श्री संताजी जगनाडे महाराज सुवर्ण महोत्सवा निमित्त ८ जानेवारी ८६ चे दिवशी तिळवण तेली समाजाने चांदीची मुद्रीका व हार देवुन सत्कार केला तसेच संताजी सेवा तिळवण तेली समाजाचे संताजी सेवा मंडळाने नगर पालिकेच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करुन त्यांची एकसष्टी साजरी केली. असे तळमळीचे समाजाचे सेवाभावी कार्यकर्ते डॉक्टर एस. टी महाले आहेत.