श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
लेखक : पी. जी. जगदाळे अॅडव्होकेट
तिळवण तेली समाज मुलतः आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला तरी अत्यंत धार्मिक व कष्ट करणारा. घरची आर्थिकस्थिती गरीबीची मात्र धार्मिक ओढा व तिर्थयात्रा करण्याची प्रबळ इच्छा. महादेव दारुणकर व त्यांचे सौभाग्यवतीना शांत बसू देईना. अखेर बद्रीनाथ यांचा आर्थिक अडचणीने पायीच करण्याचा निश्चय त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर त्यांना २३-९-१९२२ राजी पुत्र झाला त्याचे नाव बद्रीनाथ असे ठेवण्यात आले. बद्रीनाथ हे लहानपणीच अत्यंत शांत वृत्तीचे, गंभीर, अत्यंत हुशार व तल्लख बुद्धीने होते. त्यातच वयाचे ५ व्या वर्षी वडील महादेव दारुणकर यांचे अल्पवयात निधन झाले. कुटुंबावर आघात झाला. बद्रीनाथ दारुणकर यांचे बालपण पोरके झाले. त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा प्रबळ होती.
त्यावेळी नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होते. घरची परिस्थिती अत्यंत ओढाताणोची. शाळेच्या व्यतिरिक्त घरकामास हातभार लावावा या उद्देशाने बालपणातच रात्रीचे १२ वाजेपर्यंत शिंप्याकडे कपड्यांना गुंड्या लावण्याचे काम करीत असत. त्यांचे हुशारीमुळे त्यांना स्कॉलरशीप मिळाली होती. मात्र घरच्या गरीबीमुळे पुढे शिक्षण घेणे अशक्य होते म्हणून शाळा सोडली. आत्या यशोदाबाई कर्डीले यांनी त्यांना मुंबई येथे बरोबर नेले होते, त्या ठिकाणी आत्यांनी त्यांना एक पुस्तक घेऊन दिले. तेव्हा त्यांचेकडे आलेल्या पाहुण्यांनी "हा काय शिकणार आहे. तेव्हा तुम्ही त्यांना पुस्तक दिले' असे म्हणाले. तेव्हा मी शिक्षण घेऊन काही तरी प्रगती करुन दाखविन असा निश्चय केला. परत अहमदनगर येथे आल्यानंतर मॉडन हायस्कूल (सध्याचे दादा चौधरी हायस्कूल) येथे प्रवेश घेतला व १९४३ साली मॅट्रीकचे परीक्षेस प्रथम क्रमांक मिळविला. घर चालविण्यासाठी नोकरी करण आवश्यक होते. त्यातच लग्नही झाले, त्यांचे कोणत्याही नोकरीमध्ये मन रमले नाही. पूढे रेव्हेन्यू खात्यामध्ये त्यांची हुशारी. क्लार्क म्हणन नोकरी मिळाली. शेवगाव व अहमदनगर येथे नोकरी काही काळ केली. नोकरी चालु असताना अहमदनगर काॅलेजमधुन २ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर लॉ कॉलेजचे तिन्ही वर्षे नोकरी सांभाळून पुर्ण केली. रेव्हेन्यूमध्ये क्लार्क म्हणून काम करीत असताना त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे अनेक अधिकारी त्यांना लागणारे ड्राफ्ट त्यांचेकडून तयार करून घेत असत. लहानपण अत्यंत गरीबीतुन गेले असल्याने त्यांचा ओढा कम्युनिस्ट पक्षाचे बाजूचा झाला. त्यांनी लेलीन यांचा संपूर्ण ग्रंथसंग्रह केला, त्याचा अभ्यास केला. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यही त्याचवेळी करु लागले. नोकरी करणे त्यांचे मानी स्वभावास न पटणारी गोष्ट होती. समाजाबद्दलची ओढ त्यांना शांत बसू देईना. समाजसेवा करावी या उद्देशाने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व एप्रिल १९५२ पासून वकीलो व्यवसाय सुरु केला. वकीली सुरु केल्यानंतर अल्पावधीतच एक नामांकित वकील म्हणून संपूर्ण अहमदनगर जिल्हयामध्ये नाव लौकिक मिळविला. गरीबांना न्याय मिळावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असत. समाजातील व इतर गरीबांना प्रसंगी स्वखर्चाने न्याय मिळवून दिला. कायद्याचा त्यांचा अभ्यास अत्यंत सखोल असा होता. न्यायालयामध्ये कायद्याची बाजू मांडतांना त्यांनी प्रसंगी न्यायाधिशास सुनावण्यासही कमी केले नाही.
वयाचे ४० वर्षी मधुमेह हा रोगी अलोपथी (डॉक्टरी, औषधाने बरा होत नाही तर होमीओपथीचे औषधाने बरा होतो, असे वाचण्यात आल्यानंतर त्यांनी होमीओपथी या विषयाचा अभ्यास करण्यास सुरवात केली. त्यांनी त्या विषया - वरील असणारे मूळ ग्रंथाचे ग्रंथालय परीपूर्ण केले. वकीली व्यवसायाबरोबरच आपले मित्रांचे आजाराबाबतच्या अडचणी जाणून घेऊन तासनतास वाचन करुन औषधोपचार सांगित असत. त्यांनी केलेल्या औषधोपचारामुळे असंख्य लोकांना फायदा मिळालेला आहे. त्यांचा लोकसंग्रह फार होता. राजकारणामध्ये माजी आमदार श्री. फलके गुरुजी, स्व. खासदार आठरे पाटील, श्री. भगत, श्री. बापुसाहेब भापकर, श्री राम रत्नाकर, श्री. जोशी यांचेबरोबर सतत बैठकी होत. त्या कधी कधो पहाटे पर्यंतही चालत असत. त्यांचा राजकारणाबद्दलचा अभ्यास हा परिपूर्ण असा होता. राजकारणाचा अभ्यासू समिक्षक म्हणून त्यांचा नाव लौकिक होता. जिवनाबदलचा त्यांना दृष्टीकोन अत्यंत विशाल असा होता. जिवनाबद्दल ते नेहमी म्हणत असत "१०० वर्षे शेळी म्हणून जगण्यापेक्षा अल्पसे वाघाचे जिवन यांचे म्हणण्याप्रमाणेच ते वागले.. असे थोर विचारवंत, कायदेपंडित २७-४-८२ रोजी अल्पशा आजाराने आपल्यातून निघून स्मृती कायम ठेवून गेले. "मरावे परी स्मृतीरुपे उरावे" याची प्रचीती आजहा घडोघडी येते. त्यांचे स्मृतीस शत, शत प्रणाम.