श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
यांना मंडईतील सावकर म्हणून हांक मारीत असे. शरीर बांधेशूद उंची ६॥ ते ७ फूट रस्त्याने चालले म्हणजे त्यांचेकडे लोक कुतुहुलाने पाहत. मुळचे भिंगारचे नंतर नगरला आगमन.
तेल घाणे घेणे व त्यांच्या पत्नीने घरचा व्यवसाय पाहणे त्यामुळे मजुरी केल्याने आर्थिक बचत. एकंदर तीन भाऊ कै. किसनरावाना दोन मुली पहिली मुलगी कै. बाबुराव भिवसेन इंगळे यांना दिली व दुसरी हंगा येथील काळे यांना दिली तीन भावात चार मुले ही मुले कै. केशव गणपत, कै. यशवंतराव यांना दोन पत्नी झाल्या मुलेबाळे झाले नाही.
श्री. छगन यशवंत ढवळे विश्वस्त हे त्यांचे दत्तक पुत्र होय. समाजात पंचायतीत व लग्न सोहळा समारभात यांना अग्रहक्क, दानशूर म्हणून ख्याती श्री. संताजी पूण्यतिथीमध्ये नेहमी भाग घेत असे. तीन भाऊ एकत्र शेवट पर्यंत रहाणे उदाहरण घेण्यासारखे (बंधुभाव) त्यांचे पुतणे कै. जगन्नाथ छगन सुखदेव ही होय सुखदेव यांचा धंदा सायकल दुकान (रिपेअर) मुले पहातात. छगन यांचे मुले नोकरीस.