कै. गणपतराव विश्राम काळे मुळचे राहणारे वाळकी म्हणून वाळकीकर या नावाने ओळखले जात शरीरयष्टी सडपातळ, उंच काठी गौरवर्णीः हट्टी स्वभाव व रागिट. वडिलांशी पटले नाही. त्यामुळे त्यांचे १५ व्या वर्षी लग्न होवून सासूरवाडीस (काष्टी) तेलघाण्याचा धंदा, दौंड काष्टी असा तेलाचा व्यापार करीत. नंतर काही दिवसांनी परत वाळकीस सहकुटुंब आले. परत काही दिवसांनी नगर. माळीवाडा वेशीजवळ जागेत तेलाचा धंदा सुरु केला. कै. सापत्राबुवा त्यांचे मित्र त्यांचे त्यांना आर्थिक सहाय्य. हळू हळू समाजात भाग घेणे चाल केले. कै. पंढरीनाथ महादु कर्पे त्याचवेळी राहुरीहून आले. सख्खे भाचे होते. कै. मल्हारराव गोपाळा काळे हे अकोळनेरहून आले. कै. गणपतरावांचे सख्खे पुतणे. यांचे मुळ समाजाच्या लग्न समारंभात, पंचायतीत वगैरे कार्यक्रमात जाणे येण व भाग घेणे जास्त. बैलांचा व घोड्यांचा पाळणे छंद, पोळयाचे दुसरे दिवशी चांदबिबीच्या महालावर वाहन घेऊन शर्यतीत भाग, १९३२ मध्ये माळीवाड्यातील म. फूले रोडवर जागा खरेदी, दोन मुले व दोन मुली. सहकारी बँकेत नोकरीस. दोन्ही मुलांचा संसार वडिलांचे मार्गदर्शन व शिकवणी प्रमाणे चालू आहे. मुलांनी या जागेत सिमेंटची इमारत बांधली त्या जागेस “गंगोजल" असे नाव दिले आहे. वयाचे ९० व्या वर्षी निधन.