श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
दारुणकर यांचा जन्म २९-११-१९२५ रोजी झाला. त्यांनी इ. स. १९४६ पासून सार्वजनिक व सामाजिक कार्यास सुरुवात केली. नगर शहर पालिकेचे दोन वेळा अध्यक्षपद, दोन वेळा स्थायी समिती चेअरमनपद आणि १९५२ ते ७४ पर्यंत ते नगरसेवक होते. नगरपालिकेत काम करीत असताना त्यांनी अनेक विधायक व सामजिक स्वरूपाची कामे केली आहेत. प्रत्येक जकात नाक्यावर टेलीफोनची व्यवस्था व जकात विभागात सुधारणाही त्यांच्याच कारकिर्दीत झाल्या आहेत. १९६२ ते ६३ व १९६४-६५ असे दोन वेळा त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. भाऊसाहेब फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाची बहुमोल लाभ यांना मिळाला. नगरटाईम्सचे संचालक के. पोपटलाल मुनोत यांनी दारुणकर यांच्या बरोबर नगर पालिकेत काम केलेले आहे.
तिळवण तेली समाज ट्रस्टचे कारभारी ( प्रमुख ) म्हणून १९६३ पासून आजतागायत ते काम पहात आहेत. डाळ मंडईत समाजाचे विठ्ठल मंदीर आहे. त्या ठिकाणी पंजाब नॅंशनल बॅंक व मंगल कार्यालयही आहे. त्या द्वारे ट्रस्टला आर्थिक मदत होते. ग्राहक भंडाराचे संचालक म्हणून व व्हा. चेअरमन म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच ऑ.मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम केले आहे. अ. भा. तेली समाजाचे ते सदस्य व जिल्हा तेली समाजाचे ते अध्यक्ष आहेत.
तिळवण तेली समाजासाठी ते सतत कार्यमग्न असतात. आर्थिक, शेक्षणिक व सामाजिक दृष्टीने ते समाजाची अविरत सेवा करीत आहेत. ते आज रोजा नगरपालिकेत नसले तरी त्यांचा पालिकेत आदर ठेवला जात असून ते जनतेच्या अडी अडचणी सोडवुन काम करीत असतात. त्याच प्रमाणे त्यांनी केलेल्या विधायक सुचनांची व मार्गदर्शनाची दखलही घेतली जाते.