श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
प्रा. सोमनाथ दोधु सूर्यवंशी, वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ, म फुले कृषी विद्यापीठ, राहरी
प्रा. सोमनाथ दोधु सूर्यवंशी हे नासिक जिल्ह्यातील नामपूर गावातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९४२ ला शेतकरी कुटुंबात झाला आहे. गावात मॅट्रीक पास झाल्यानंतर त्यांनी बी. एस. सी. (कृषी) पदवी पुण्याच्या कृषि महा विद्यालयातून १९६४ ला प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर ते नोकरीला लागलेत. कृषि संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालय धुळे येथे जवळ जवळ बारा वर्षे अध्यापण व संशोधनाचे काम केले.
त्यानंतर नोकरी करत असतांना एम. एस. सी. (कृषि) पदवी प्रथम श्रेणीने गुण मिळवून ते पास झालेत. त्यांची बदलो म. फुले कृषि विद्यापोठ, राहुरी यथे १९७५ ला झाल्याने त्यांचे अध्यापनाचे व संशोधनाचे काम राहुरीस चालू आहे.
सरकारतर्फे त्यांची १९८० साली भारतीय कृषि संशोधन संस्था, दिल्ली येथ पो एच डी, साठी निवड झाली. तेथ सुद्धा त्यांनी प्रथम श्रेणीत अभ्यासक्रम पूर्ण केला. या सर्व कालावधीत त्यांनी लेक्चरर, सहाय्यक प्राध्यापक, संशोधन अधिकारी वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ इ. पदे भुषविलीत त्यांचे जवळ जवळ २५. संशोधनपर पेपर्स भारतातील निरनिराळ्या । संशोधन अहवालात प्रसिद्ध झालो आहेत. तसेच त्यांनी जलसिंचनावर दोन संशोधन पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
नुकतेच ते परदेशअभ्यास दौरा पूर्ण करून आले आहेत. भारतातून दोन अर्थशास्त्रज्ञांची निवड करण्यांत आली होती, त्यातील ते एक होते. या निवड दौऱ्यात दोन महिन्याच्या कालावधीत त्यांनी फिलीपाईन्स, थायलंड, हाँगकाँग इ. देशांना भेटी दिल्यांत. तेथील प्रशिक्षणांतही त्यांनी विशेष प्रावीण्य गुण मिळवून सन्मानपदविका मिळविली.
त्याचप्रमाणे सामाजिक कार्य व सर्व थरांतील समाज बांधवांत मिळून मिसळून राहणे त्यांना आवडते. समाज बांधवासाठी शक्य असलेली मदत करण्याची त्यांची धडपड चालू असते. तसेच समाज बांधवाना सुधारीत शेतीबद्दलचे मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतात. सर्व कुटुंबाची, कार्यालयाची, समाजकार्याची जबाबदारी सांभाळून, त्यांची परिक्रमा चालू आहे. घरातील व कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विमलबाई सांभाळत असल्याने वरील सर्व कामासाठी प्रा. सुर्यवंशी यांना वेळ देणे शक्य होते. तेव्हां त्यांच्या कार्यात, त्यांच्या पत्नीचा तेवढाच सहभाग आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade