श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव भिवसेन इंगळे, इंगळे हॉटेलवाले म्हणून जास्त प्रसिद्ध मॅट्रीक पर्यंत शिक्षण समाजाबद्दल आस्था १९५२ ते ७४ पर्यंत तेली समाजाचे विश्वस्थ. त्यांचे कारकिर्दीत पंजाब नॅशनल बँन्केस जागा भाड्याने दिली. वेळांतवेळ काढून समाज्याच्या कामात लक्ष व मार्गदर्शन. हे चौघे भाऊ कै. काशिनाथ भिवसेन इंगळे, कै. दशरथ भिवसेन इंगळे, बबनराव इंगळे व ते स्वतः कै. काशिनाथ व कै. दशरथ राव यांनी अत्यंत बिकट परिस्थितीस तोंड दिले. मोल मजुरी व नोकरी केली. त्यातून कै. बाबुराव यांचे शिक्षण केले. त्यांनीही त्यांचा आदर ठेवून शिक्षण घेऊन इंगळे घराण्याचे नाव मिळविले. धंद्यात हुशार. हॉटेल व्यवसाय करुन बाजार पेठेतील तूप, साखर वगैरे माल घेऊन व ते साठवून त्यांत पैसे मिळवत असत. त्यांचे तीन ठिकाणी हॉटेल होती. सर्जेपूरा येथे १ व तेलीखुटावर २ त्यांचे त्यावेळी हॉटेल उत्तम चालत असत. त्यांना एकच मुलगा आहे. ( चि, बापूसाहेब ) त्यांच्यः सूविद्यपत्नी श्रीमती हिराबाई यांचे मार्गदर्शन चांगले. आळंदीस दर एकादशीस जात असे. धार्मिक प्रवृत्ती गरीबाबद्दल आस्था त्यांच्या हॉटेलात नोकरी करणारे त्यांनी हॉटेल दुकान टाकले. त्यांचे त्या बाबत मार्गदर्शन असे. १६ ते १८ तास हॉटेलमध्ये ते सतत काम पहात असत.