श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. नामदेव विठोबा क्षिरसागर. सावकार हे सावकार म्हणन प्रसिद्ध असून या नावाने ओळखले जात. सोयरिक जमविणे, निवडणूक प्रचारात भाग घेणे यात त्यांचा हातखंडा असे. घोड्याचे शौकिन असत. त्यात त्यांची पारख उत्तम. तांगा पासिंगचे वेळी त्यांना बोलावून घेत. गरिबांबद्दल अस्था, तेव्हां त्यांचे सांगणेवरुन कामे होत व करवून घेत असत.
तिळवण तेली समाजात वयोवृद्ध असे समाज बांधव म्हणून प्रसिद्ध. बांधकामाची पाहणी व करुन घेण्यात अग्रेसर. शिक्षण अल्प, पण हिशोब अचूक असे. त्यामुळे सुतार, गवंडी त्यांना मानित असे त्यांचे कारकिर्दीत तेलीखुंंटावरील व डाळ मंडईतील जागा घेणे रिपेअर करणे व बांधणे हे काम होवून त्यात त्यांचा सिंहाचा वाटा. धर्मिक कामात लक्ष. त्यांना सहा मुले असा परिवार. मुले कर्तबगार. मुलांना त्यांचे मार्गदर्शन. मुले नोकरी करुन सुखी. सावकार जसे गरीब लोकात मिसळून राहत तसेच श्रीमंत वर्गातील मंडळीत देखील स्थान . त्यामुळे त्यांचे हातून कामे पुष्कळ झाली. समाजात आशास्थान असे. त्यांना आजार असा माहित नव्हता. शेवटपर्यन्त त्यांची प्रकृती उत्तम.