कै. हरिभाऊ भाऊ देवकर यांना हरिभट मामा म्हणून नावाने हाक मारीत असे. एकंदर चार भाऊ १) कै. रंभाजी भाऊ २) कै. हरिभाऊ भाऊ ३) कै. दगडूभाऊ ४) कै. सहादु भाऊ दाळ, मंडई येथील जे. श्री विठ्ठल मंदिरा करिता ज्याने जागा दिली ते कै. सावळेराम गुंडिबा देवकर यांचे ह सख्ख पुतणे होय. कै. हरिभाऊ यांना दोन पत्नीपासून दोन मुली झाल्या. एक मुलगी नागले घराण्यात दिली व दूसरी मुलगी साळुंखे घराण्यात दिली. त्यांना प्रत्येकी घर जागा देण्यात आली. कै. सहादु भाऊ यांना देखील दोन पत्नी होत्या. त्यांना तीन मुली व एक मुलगा असा परिवार यांच्या दोन मुली दारुणकर कारभारी घरण्यात दिल्या व एक चास गावी घोडके यांना दिली. एकुलता एक मुलगा म्हणजे नारायण सहादू हा नगर पालिकामध्ये नोकरीस आहे. ते देखील समाजाचे धार्मिक कामात अत्यंत तळमळीने भाग घेत. कै. हरिभाऊ देवकर हे समाजात सर्जेपूरा भागातील एक प्रतिष्ठीत समाज बांधव पंच म्हणून ओळखले जात असत. त्यांनी त्यांचे सहकारो कारभारी शिंदे, काळे, लोखंडे, कर्पे, सेंदर वगैरे यांना सहकार्य केले. त्यामुळे त्यांना समाजात अग्रस्थान असे. तेलीखुंटावरील इमारत जागा बांधणे व पाहणे याबाबत यांचा सल्ला घेण्यात येत असे. अत्यंत मनमिळावु स्वभावाचे होते. त्यांचा धंदा तेलघाणीचा होता. त्यांना त्यांचे हयातीत दुसरी पत्नी श्रीमती हरणाबाई यांनी त्यांना सहकार्य देऊन धंदा वाढविला. त्या हुशार व मनमिळावु होत्या. पहिली पत्नी श्रीमती काशिबाई यांचे निधन. मुलगी जन्माला आलेवर सहा महिन्यांनी त्यांचे निधन झाले. त्यामुळे श्रीमती हरणाबाई ह्याच सर्व कारभार पाहत असत.
यांचा नातू म्हणजे नागले रेवण्णानाथ एकनाथ याने तिळवण तेली समाजाचे विश्वस्त म्हणन पाच वर्षे काम केले, यावरुन देवकर व त्यांचे आप्तेष्ट मंडळी हे समाज कार्यास वाहन घेत असत हे यावरुन दिसते.