श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव सदोबा देवकर तेलीखुंटावर रहात. अत्यंत गरीब परिस्थितीत दिवस काढन त्यांनी त्यांचे हयातीत तीन मजली इमारत बांधली. शिक्षण इंग्रजी ५ वी पर्यंत काही वेळा ते इंग्रजीतून चांगले बोलणी करीत असत. त्यांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल अभिमान असे ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत असे. ज्ञानेश्वर मंडळांत ते नेहमी ज्ञानेश्वरी वाचीत. भक्त त्या ठिकाणी जमत असे व श्रवणाचा लाभ घत असत दर वर्षी ते आंळदीस जात असे तसेच ते श्री देवीचे (जंगदंबचे) भक्त होते.
समाजात अग्रस्थान असून समाजाची सेवा तीस वर्षे खजिनदार व सेक्रेटरी म्हणून केली. त्यांची कारकिर्द वाखण्यासारखी. पंचायतीत भाग घेऊन प्रश्न हाताळण्यात व सलोखा करण्यात त्यांना यश. त्यांच्या कारकिर्दीत तेलीखुंट वरील जागा व दालमंडईतील जागा पाहणी करणे बांधकाम करणे यात अग्रेसर असून त्यांत त्यांना यश असे. त्यांना एकच मुलगी आहे. तिला देखील एकच मुलगा आहे. देवकर बिल्डींग म्हणून चाैकात आेळखली जाते. कै. देवकर हे अभिमानाने सांगत की कै. पंडीत नेहरुस एकच मुलगी आहे. त्याच प्रमाणे माझी मुलगी आहे. ती कर्तबगार निघेल ते बोल आजही खरे ठरत आहेत.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade