श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. तुकाराम भिकुजी म्हस्के, यांना जेऊरकर म्हणून हाक मारीत. शिक्षण कमी मात्र व्यापारांत हुशार. गरीबी परिस्थिती हाताळून त्यांवर मात केली. तेल घाणीचा व्यवसाय. अंबिका तेल सोसायटीत सदस्य होते. अनुभव धंद्यात चांगला, मार्गदर्शन, करडी घेण्यांत व पारखून घेण्यांत हातखंडा. कमी बोलणे व जास्त काम करून दाखविणे याबद्दल ख्याती. त्यांना दोन पत्ली व चार मुले. सरदार वल्लभभाई पटेल रोडवर तेल व्यवसाय व किरणा दुकान होते.
१९५२ पासून ७४ पर्यन्त समाजाचे ट्रस्टचे विश्वस्त. त्यांचे कारकिर्दीत जागा बांधणे ही कामे झाली. त्यात ते नेहमी भाग घेत असत. पंचाची पंचायत मध्ये स्पष्ट व अचूक बोलणे. पंजाब नॅशनल बॅन्केस जागा भाड्याने देणे व उत्पन्न वाढविणे यांत भर. वडील बंधू कै. नामदेव भिकू म्हस्के यांचे त्यांना मार्गदर्शन बंधुभाव व एकीचे उदाहरण घेण्यासारखे.