श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१५ ऑगष्ट १९६६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वणीवर यांचा मुख्यमंत्री मा. ना. वसंतरावजी नाईक यांचे शुभहस्ते सन्मानपत्र देवून स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र माधवराव दारुणकर यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, भारतीय स्वातंत्र्याच्या रजत जयंतीनिमित्त १५ ऑगष्ट १९७२ रोजी अहमदनगर शहर पालिकेच्या सभागृहात अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रामभाऊ निसळ यांचे शुभहस्ते व जिल्हाधिकारी मा. अनिलकुमार लखिना यांचे अध्यक्षतेखाली ताम्रपट प्रदान करण्यात आला. १७ फेब्रुवारी १९७९ रोजी दिल्ली येथे महामंत्री इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य सैनिक मेळाव्यातही यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र राज्याचा रौप्य महोत्सवा निमित्त मुळा सहकारी साखर कारखान्याचे खासदार यशवंतरावजी गडाख यांचे शुभहस्ते गौरव पत्र देवून यांचा सन्मान केला. त्यांचे चिरंजीव कै. विठ्ठलराव दारुणकर यांचे स्मरणार्थ तिळवण तेली समाजाच्या विठ्ठल रुख्माई मंदिराच्या पुढच्या खोलीच्या बांधकामासाठी पंधरा हजार रुपये देणगी दिली. नगर येथील हैदराबाद बँकेत पाच हजार रुपये ठेवले असून स्व. विठ्ठलराव यांचे नावे दरवर्षी अथलेटिक्स सामने ठेवून व्याजाच्या रकमेतून पारितोषिके दिली जातात. या स्पर्धांचे नियोजन अहमदनगर जिल्हा अॅमॅच्युअर्स अॅथलेटिक्स असोशिएशन करते पंढरपूरच्या श्री तनपुरे महाराज मठाला पाच हजारांची देणगी दिली. तिळवण तेली समाज ट्रस्टच्या स्थापनेपासून चीफ ट्रस्ट म्हणून कार्य केले. श्री. संताजी महाराज पुण्यतिथी समारंभानिमित्त दोनवेळेस भंडा-याचे जेवणाचा खर्च यांनी केला. गोर-गरीब समाज बांधवासाठी मदत करण्याच्या दृष्टीने नेहमी अग्रेसर.