पौड मध्ये घराचे छप्पर डळमळीत झाले. पावसाळ्यातील पाऊसाच्या झडीत ते अधीक मेटाकुटीस येत होते. घर चालवणेच जिकेरीस येत आसे. यातुनही हा चि. अनंत वाचकवडे एम.ए. झाला. सुशिक्षीत बेकार्यांंच्या तांड्यातील एक घटक झाला. या तांड्यात वावरण्यापेक्षा परस्थीतीवर मात करावी नुसते रडगाणे गात बसण्यापेक्षा हात पायांना गती द्यावी या साठी इंदापूर येथे शिंदे आत्याकडे गेला. या ठिकाणी अत्याभावाकडे थांबला. गेली 50 वर्ष इंदापूर शहराला जीवन फोटो स्टुडीओ चांगलाच परिचीत. गिर्हाईकाची वर्दळ वाढत गेलेली याच स्टुडीयोत चि. अनंत विद्यार्थी म्हणुन आले. फोटो तंत्रज्ञान समजुन घेता घेता. बदलते तंत्रज्ञान एक सोबती बनला. या ठिकाणी पगाराचे पैसे साठवुन एक कॅमेरा घेतला या कॅमेरा सोबतीला ठवून व्यवसाय शोधु लगले. या कॉमेरावर म्हणावा असा रिझल्ट येत नव्हते. स्वतःच काही पैशे व उसनवारी पैसे घेऊन चांगला 12000 चा कॅमेरा घेतला या मुळे काम मिळू लागले. याच्या प्रिंट दुसरीकडे काढण्यापेक्षा आपणच काढु या साठी धडपड सुर केली यातुनच संगणक व प्रिंटर्स खरेदी व्यवसायाला आकार आणला घराच्या छपराला भक्कम पणा आला मी सुशिक्षित आहे. मी एम.ए. शिक्षित आहे. नोकरी नाही म्हणुन बेकार आहे. हे रस्ते सोडले म्हणुन चि. अनंत वाचकवडे स्वत:च्या पायावर उभे रहातात सहकार्य घेऊन चालु लागले.