कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तिळवण तेली हिन्दु, अहमदनगर यांचे जीवन चरीत्र

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)

    कै. काशिनाथ भिवसेन इंगळे तिळवण तेली हिन्दु, अहमदनगर यांचे जीवन चरीत्र जन्म इ. स. १८९१ मृत्यू इ. स. १९६९, कै. काशिनाथजी भिवसेन इंगळे तिळवण तेल'. शिक्षण इयत्ता ४ थी, धंदा तेल घाणी.

    कै. काशिनाथजी यांचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. परिस्थिती जेमतेम मोलमजुरी करुन तेलघाणी व रेवडी कारखान्यात कामावर रोजंदारीने काम करुन कुटुंबाचा निर्वाह करीत असे कुटुंबात कै. दशरथराव, कै. बाबुराव, श्री. व बबनराव हे त्यांचे बंधू होते.

   एकत्र कुटुंबात जन्म झाल्यामुळे व आई-वडील वयस्कर असल्याने कुटुंबात सर्वात थोरले, यामुळे अगदी बाल अवस्थत पाच भाऊ एक लहान बहिण, आई-वडिल या कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविणे कठिण होत असे. अशा परिस्थितीत सहाजिकच तेलघाणींवर स्वत: जातीने काम करून तसेच कित्येक वेळेला रेवडी बनवण्याचे कामावर मजुरी करीत असे. परिस्थितीशी मुकाबला करीत असतांना थोड्या अल्प भांडवलावर त्यांचे मातोश्रीचे मार्गदर्शनाने त्यांनी तेलीखंटावर हलवाई (गोडामाल मिठाई) दुकान सुरु करुन आपण स्वतः भट्टीवर माल तयार करुन भावंडांना हाताशी घेऊन दुकानात मार्गदर्शन करुन दुकानची निट घडी बसवून काही भावंडांना शाळेत घातले. त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून नित्य नियमाने शिक्षण सुरु केले.  

    दुकानात कष्‍ट, जिद्द, सचोटी, ग्राहकांशी नम्रता यांचा समन्वय साधून आपल्या धंद्यात चढती कमान ठेवून आर्थिक परिस्थिती सुधारताच हलवाई दुकानाचे रुपांतर तीन अलीशान हॉटेल नगरमध्ये सुरू केले. त्यांची व्यवस्था कै. दशरथ व कै. बाबुराव इंगळे हे पहात असत कै. काशिनाथजी याना तरुणपणी व्यायामाचा छंद होता. ते दरराज व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करीत असत. हा छंद एवढा वाढला की त्यांनी तालमी बाहेरगावी जाऊन अनेक प्रतिस्पर्धी मल्लांशी आखाड्या कुस्त्या करुन विजयी होऊन रोख बक्षिसे मिळविली. त्यांनी आपले अनेक मल्ल स्वत:चे खर्चाने आर्थिक मदत देऊन तयार केले. अहमदनगर शहरात हे प्रथम दर्जाचे पहिलवान असे नाव कमविले. तसेच त्यांना हॉकी खेळण्याचाही नाद होता. त्यांनी याही क्रीडाक्षेत्रात नाव लौकिक मिळविला.

    बिल्डिंग बांधकामाची यांना चांगली माहिती होती. त्यांनी आपल्या समाजाचे दोन बिल्डिंगचे काम आपल्या समाज बांधवाचे मदतीने व आपल्या मार्गदर्शनाने अत्यंत काटकसरीने बांधकाम पूर्ण केलेले आहेत. त्या वास्तु आज समाजात उभ्या आहेत. कै. काशिनाथजी भाविक होते. त्यांची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती. त्यांनी भाविक लोकांची सोय व्हावी म्हणून श्री क्षेत्र बुर्‍हानगर येथील श्री जगदंबा मातेच्या देवळाजवळ सभामंडपाचे काम अत्यंत मजबूत करुन भाविकांची सोय करवून दिली. समाजास अडीअडचणीचे वेळेस वेळेवर आर्थिक मदत करीत असे. समाजातील गोरगरिबांना आर्थिक मदत देऊन त्यांचे आशीर्वाद घेत असे. समाजातील गरीब शिक्षण घेतलेल्या मंडळींना चांगल्या ठिकाणी. कामाची संधी उपलब्ध व्हावी याकरिता त्यांनी आपले बंधू कै. बाबूराव किसनराव इंगळे यांना उत्तेजन देऊन अहमदनगर शहर पालिकेत शहर पालिकेच्या निवडणुकीस उभे करुन निवडून आणले. सतत सोळा वर्षे समाजसेवा करीत असताना एक वेळेस शहर पालिकेत नगराध्यक्षपद भुषविले. यामुळे आपल्या समाजातील गरीब मंडळींना कामावर कायम करुन घेतले.

    दिवसेंदिवस श्रीकृपेने आर्थिक परिस्थिती सुधारत असा त्यांनी नव्या धंद्यास सुरवात केली. श्री बोधेश्वर प्रवासी वाहन व माल वाहतूक सहकारी कं. अहमदनगर ते शेवगाव सर्व्हिस सुरु केली व जनतेची सोय केली. आज त्यांनी सुरु केले हॉटेल धंद्याची वास्तु श्री कृष्ण विलास हॉटेल आणि संतोष भवनी हॉटेल्स त्यांची मुले नातवंडे पाहन आहेत.

    धडधाकट शरीर शांत स्वभाव निर्व्यसनी साधी रहाणी समविचारी सजाजसेवेची कळकळ या सर्व गुण संपन्न अशा थोर पुरुषास आमचे शतशः प्रणाम.  

दिनांक 25-04-2020 21:19:45
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in