तेली समाजातील जुन्या पिढीतील कार्यकत्यांच्या माहितीसाठी काशिनाथ रघुनाथ (कारभारी) दारुणकर, अहमदनगर यांची मुलाखत

श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्‍सव  स्‍मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)

मुलाखतकार -  रमेश पांडूरंग पुंडलीक, 

    पुरातन कालापासून वंशपरंपरागत तिळवण तेली समाजाचे कारभारीपद आजतागायत ज्यांच्या घराण्याकडे आहे अशा घराण्यातील एक जेष्ठ समाजसेवक काशिनाथराव कारभारी यांची मुलाखत घ्यावी व जुन्या पिढीतील समाजाचे कार्यकर्ते नारायणराव दारूणकर, गोविंदराव दारुणकर, रघुनाथराव दारुणकर यांच्या बद्दलची माहिती नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना द्यावी. प्रस्तुत माहिती त्यांना मार्गदर्शक व स्फ़ुर्तिदायक ठरेल या हेतूने मी हा मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. नि घरात प्रवेश करताच प्रसन्न मनाने माझे स्वागत केले. 

श्री. दारूणकर - नमस्‍कार महाराज,  आज फारच निवांत ?

संपादक - हो. आज निवांतच आहे. आणि निवांतपणे मी तम्मान काही माहिती विचारणार आहे. आपण ती माहिती सांगाली अशी माझी इच्छा आहे. 

श्री. दारुणकर - हो विचारा की, काय हव ते ?

संपादक - तुमच्या वडिलांचे संपूर्ण नांव काय ?

श्री. दारुणकर -  माझ्या वडिलाचे संपूर्ण नांव श्री. रघुनाथ सावळेराम दारुणकर त्यांच्यापेक्षा त्यांना मोठे दोन भाऊ होते. सर्वांत मोठे श्री. नारायणराव व दोन नंबर श्री. गोविंदराव. 

संपादक - गोविंदराव व नारायणराव यांच्याबद्दलही तुम्हाला पुष्कळ माहिती असेल ?

श्री. दारुणकर - तशी फार माहिती नाही पण नारायणराव शरीराने सडपातळ, स्वभावाने तापट व कडक. वारकरी संप्रदायाचे होते. 'निवृत्तीनाथाचे पालखी' बरोबर ते पंढरपूरला नेहमी जात असत. समाजकार्यांतही त्यांचा पुढाकार असे. एकदा तर पैठण येथे तेली समाजाची भव्य परिषद भरली होती. त्या प्रसंगी समाजाने त्यांच्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली व त्यांनीही ती जबाबदारी यशस्वीपणे पार पडली व उपस्थित समाजाला मार्गदर्शन केले. 

संपादक- आणि गोविंदराव बद्दल काय माहिती आहे ? 

श्री. दारुणकर- गोविंदरावांचा पिंड पहिलवानी होता. त्यांना तालमीची खुप आवड. दिसायला गोरेपान व उंचेपुरे. स्‍वभावाने अत्‍यंत कडक आणि तत्कालिन समाजात खूप दरारा होता त्‍यांचा घरी तेलाचा आणि रेबडीचा कारखाना होता. समाज कार्याची खूप आवड. प्रत्येक कामात पुढाकार.

संपादक - आपल्‍या वडिलांचे बालपणाबद्दल आपणास कोणती माहिती आहे ?

श्री. दारुणकर - आमचे वडील रघुनाथराव कारभारी याचे बालपण व तारुण्याचा पूर्वाध तसा गरिबीतच गेला. शिक्षण अत्यंत तुटपुन्जे म्हणजे तिसरी-चौथी पर्यन्त झालेले. परंतु बुद्धिमत्व मात्र खूप होती. ते खूप व्यवहार कुशल व प्रयत्नवादी होते. 

संपादक - तुम्ही आता म्हणालात की, ते प्रयत्नवादी होते. त्यांच्या प्रयत्नवादी स्वभावाबद्दल काही उदाहरणाची माहिती सांगता येईल ?

श्री. दारुणकर - अहो, त्यांनी आमच्या नातेवाईकांकडेच स्वतः घाणे घेतले. आईने गिरीची कामे केली. आणि गरिबोवर मात केली व आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. हाच त्यांचा प्रयत्नवाद नव्हे का? 

संपादक - थोडक्यात प्रयत्न हाच त्यांचा परमेश्वर होता नाही का ?

श्री. दारुणकर - नाही. तसे नाही. प्रयत्नाला जरी ते परमेश्वर मानीत होते तरी त्यांची परमार्थाकडे, धार्मिकतेकडे ओढ होती. श्रद्धा होती

संपादक - धर्मावरील श्रद्धे संबंधी एखादे उदाहरण देता यईल ?

श्री. दारुणकर - होय, बेलापूरहून एकदा श्री. निवृत्तीनाथांची पालखी नगरला आली. या पालखीचे प्रमुख बेलापूरचेच ह. भ. प. परमपूज्य भागवत महाराज होते. त्यांच्याशी वडिलांची भेट झाली. त्या भेटीत महाराजांनी त्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या शुभाशीर्वादानेच वडिलांचे कल्याण झाले. गरीब परिस्थिती झपाट्याने बदलली. असे ते नेहमीच सांगत असत. आणि आजतागायत आम्ही या पालखी बरोबर येणाऱ्या भाविकांना आमच्या परिस्थितीनुसार शिधा देण्याचा प्रयत्न करतो.

संपादक - एकंदरीत परमपूज्य भागवत महाराजांचा आशीर्वाद आणि वडिलांचा प्रयत्नवाद यावरच तुमचे घराणे सुखवस्तु व  समद्ध झाले ?  पण काय हो. वडिलांनी फक्त प्रपंचच नीटनेटका केला का ? समाजाच्या सेवेसाठी त्यांनी काही प्रयत्न केले असतीलच की नाही ?

श्री. दारुणकर - तर ? भर तारुण्यात ते होते. प्लेगाची भयंकर साथ बोकाळली होती. अशा वेळी मत झालेल्या समाज बांधवांची प्रेत खांद्यावरून, पाठीवरून तर कधी बैलगाडीने त्यांनी वाहुन नेली, आणि गावाबाहेर असलेल्या चुना भट्टीत त्यांचे दहन केले. त्याच्या नातेवाईकांना आधार दिला सांत्वन केले. समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सध्या भिकुसा विडीचा जो कारखाना पंचाच्या इमारतीत आहे ही इमारत पूर्वी सावकाराच्या ताब्यात होती. त्यांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रसंगी स्वत:चे पैस यासाठी निःस्वार्थ बुद्धीने खर्च केले व त्यात त्यांना यश मिळाले. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामातही इतरांबरोबर त्यानी भगिरथ प्रयत्न केले. नगर शहरात श्री. संताजी महाराज पुण्यतिथी समारंभ साजरा करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. या प्रसंगी वर्गणी गोळा करुन ‘बाग बगीचा’ या भंडाऱ्याचा कार्यक्रमही सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

संपादक - वडिलांच्या यशस्वी जीवनाचो प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ?

श्री. दारुणकर - अल्प शिक्षण परंतु कुशाग्र बुद्धी व्यवहार कुशलता, कर्तव्य तत्परता या गुणांच्या जोरावर समाजातील प्रत्येक निर्णयाला चिटकून राहुन न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता. कार्य करीत असतांना अनेकदा तणावपूर्ण प्रसंगही आलेच, पण जिद्दीने व कुशलतेने त्याला तोंड दिले. व समाज संघटीत केला. व ऐक्य बद्दल समाजाच्या विकासासाठी ते अविरत पणे प्रयत्नशील राहिले.

संपादक - बरय ! आपण मुलाखती साठी आपला मौल्यवान वेळ खर्च करून बहुमोल सहकार्य केले त्याबद्दल मी आपला ऋणि आहे. नमस्कार !

दिनांक 25-04-2020 20:33:30
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in