श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
सत्कार समारंभानिमित्तच्या भाषणाचा गोषवारा प्रा. एस. डी. सूर्यवंशी वरिष्ठ कृषि अर्थशास्त्रज्ञ
श्री संत संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा जो स्तुत्य कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याला समाजाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. समाज बांधवांनी जे गोड कोतुक करून आमच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविला त्याबद्दल आम्ही सर्व सत्कार्थी बंधूना आनंद होत आहे आपल्याच माणसांनी आमच्या चांगल्या कामाची पावती द्यावी, यात आम्हाला तसेच समाजातील सर्व तरुण वर्गाला निश्तिच स्फूर्ती मिळेल.
मी थोडेफार शैक्षणिक क्षेत्रांत जे काही करू शकलो, जे घडवु शकलो यात निश्चितच माझ्या आई-वडीलांचे व कुटुंबियांचे श्रेय आहे. परंतु हे सर्व घडविताना समाज हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा समाजाने सुद्धा मला घडविण्यात व रुप देण्यात महत्त्वाची भूमिका केलेली आहे. तेव्हा समाजाचे सुद्धा माझेवर तितकेच ऋणी आहे व ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे फेडणे हे माझे कर्तव्य आहे, असे मी समजतो. मी समाजऋण फेडण्याचा जरुर प्रयत्न करीत आहे व करीत राहीन. मी शेती शास्त्राचे प्रगतीशील ज्ञान घेतलेले आहे. पुष्कळ समाज बांधव शेती धंद्यात आहेत. आजची शेती म्हणजे एक उपजिविकेचे साधन आहे, परंतु त्याचे कडे धंदा म्हणून माझ्या समाज बांधवांना कसा परवडले, याचे मार्गदर्शन करून मी समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करीन. अशाने जसा समाज बांधवांचा फायदा होईल, तसाच आपल्या देशाचा होईल.
या समारंभानिमित्त, माझे सर्व समाज बांधवांना असे आव्हान आहे की, त्यांनी प्रगती केलेल्या, त्या त्या क्षेत्रातील अनुभवांचा शक्य तेवढा फायदा, आपल्या मागासलेल्या समाज बांधवांना करुन द्यावा व त्यांनीही ऋण फेडावे. शेवटी हा कार्यक्रम घडवून आणून, आमचे कौतुक केल्याबद्दल समाजबांधवांचे संयोजकांचे आभारी आहोत.
- जय संताजी महाराज -