श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव (१९३६ ते १९८६) समारंभांचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व राज्यमंत्री, रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष व जगदंबा सहकारी साखर कारखान्याचें (राशिन) चेअरमन सन्माननीय ए. बु. तथा आबासाहेब निंबाळकर यांचे मार्गदर्शनपर भाषण.
उपस्थित बंधू-भगिनींनो,
अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने आजचा हा आगळा वेगळा सत्कार समारंभ सोहळा होत आहे. तिळवण तेली समाजातील महान संत आणि संतशिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे शिष्योत्तम संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीच्या पर्वणीवर आताच ह. भ. प. रमेश पुंडलिक महाराज यांनी लिहिलेल्या "श्री संताजी महाराज जीवन चरित्र" या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
बऱ्याच लोकांना आपल्या समाजातील थोर व्यक्तिची माहिती नसते. त्यांचे कार्य विदित नसते. अशा पुस्तकांच्या माध्यमातून संताजी महाराजांचे जीवन व कार्याचा परिचय सर्व समाजबांधवास करुन देण्याचा प्रयत्न या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांचा हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय वाटल!.
थोड्याच वेळापूर्वी ट्रस्टच्या वतीने समाजातील वयाची एकसष्ठी ओलांडलेल्या आणि समाजासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांचा 'चांदीचे स्मतिचिन्ह' देवून सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचाही माझ्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्कारात मी व आपण सर्वांनी बघितले आहे की, क्रीडाक्षेत्रामध्ये राज्य पातळीवर सुयश मिळविणान्या कोपरगावच्या अत्यंत अल्पवयीन कुमार
शेलार व कुमार दारुणकरांपासून तर कार्यक्रमाच्या व्यासपीठापर्यन्तही ज्यांना चालता येत नव्हते अशा काही अत्यन्त वयोवृद्ध व्यक्तिचा समावेश होता. गुणवान अध्यापक, डॉक्टर, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सत्कार समारंभासाठी जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांनी, भगिनींनी या सर्व सत्कार मुर्तिपासून प्रेरणा घ्यावी. त्यांच्याप्रमाणेच आपणही आपापल्या क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कार्य करुन आणि आपल्या व समाजाच्या लौकिकामध्ये मोलाची भर घालावी हा खरा या समारंभाचा मूळ हतू आहे.
तसे पाहिलेतर तिळवण तेली समाज हा अत्यंत अल्पसंख्याक व अविकसित समाज आहे. परन्तु या समाजात उच्च शिक्षितांनी इतरांना मार्गदर्शग केले पाहिजे. जे धनवान आहेत त्यांनी गुणवान परंतु गरीब असलेल्या समाजबांधवाच्या प्रगतिसाठी आर्थिकदृष्टया मदत करुन हातभार लावला पाहिजे. असे झाले तर समाजाच्या - प्रगतीला मुळीच वेळ लागणार नाही.
समाजाच्या उद्धारासाठी या ट्रस्टचे कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील आहेत. आपणावर त्यांनी काही जबाबदारी सोपविली, आपणाकडन काही सहकार्य मागितले तर आपण सर्वानी त्यांच्या प्रयत्नास हातभार लावला पाहिजे. आजचे युग हे संघटनेचे युग आहे. सर्व समाज संघटीत झाला तरच त्या समाजाला आपला उत्कर्ष साधता येईल आणि आपली या समारंभासाठी असलेली भव्य उपस्थिती पाहन मला खात्री आहे की, आपण सर्व आपली सामाजिक बांधिलकी पत्करुन समाजा विकासासाठी नेहमीच दक्ष राहाल.
ट्रस्टच्या पदाधि-यांनी या समारभास प्रमुख पाहणे म्हणन मला निमंत्रित केले त्याबद्दल त्यांना आणि आपणा सर्वांना धन्यवाद।