श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी (सुवर्ण महोत्सव 1936 ते 1986) अर्जुनराव इंगळे सेक्रेटरी, अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट यांचे स्वागतपर भाषण
उपस्थित समाज बंधू-भगिनींनो
२९ नोव्हेंबर १९८५ रोजी आमच्या ट्रस्टची सभा झाली आणि संतश्री संताजी महाराज जगनाडे यांची सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी अत्यंत उत्साहाने साजरी करण्याचा प्रस्ताव सर्वांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केला. या कार्यक्रमाची रुपरेषा ठरली त्यानुसार कार्यक्रमाची कार्यवाही यशस्वीरित्या व्हावी म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या नि प्रत्येकजण आपापली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धडपडू लागला.
या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारंभ प्रसंगी वयाची एकसष्ठी पार केली आहे. असे समाज बांधव व भगिनी, शैक्षणिक, सामाजिक व इतर अन्य क्षेत्रांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरीकरुन गौरव पात्र ठरलेले समाज बांधव याचा चांदीचे स्मृतिचिन्ह देवून समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करावा. त्यांचे कार्य सीना माहिती व्हावे व त्यापासून समाजातील इतर बंध-भगिनींना मार्गदर्शन व्हावे. प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला. सत्कारमूर्ती व जिल्हयातील समाज बांधवांना या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आणि आज या ठिकाणी जमलेल्या, जिल्हयाच्या काना कोपऱ्यातून स्वखर्चाने आलेल्या समाज बांधवांची ही प्रचंड संख्या पाहिल्यावर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आश्चयांचा सुखद धक्का बसल्याशिवाय मुळीच राहाणार नाही.
समाजाची व्यावसायिक परिस्थिती दयनीय आहे. महागाई व दुष्काळाने समाज होरपळून निघाला आहे. आणि अशा अवस्थेत केवळ आपले संत श्री जगनाडे महाराज यांच्या विषयीचा आदर आणि समाजाबद्दल आपल्या मनात असलेला जिव्हाळा या मुळेच एव्हढया प्रचंड संख्येने आपण आमच्या आवाहनास उत्सफूर्त प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर अशाप्रकारचा संपूर्ण जिल्हयातील लोकांचा मेळावा प्रतिवर्षी आयोजित करावा अशा प्रकारची सूचनाच आपण या प्रसंगी मोठ्या संख्यने उपस्थित राहन केली आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुणे म्हणून आपण अनेक मान्यवरांना निमंत्रित केले तथापि कार्यवाहल्यामुळे काही जण येवू शकले नाहील, असो-नगर जिल्हयातील लोणी येथील रहिवासी व महाराष्ट्र राज्य लघु पाटबंधारे खात्यातील आपल्या समाजाचे नामवंत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सन्माननीय व श्री. वसंतराव रत्नपारखी साहेब यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. महाराष्ट्राचे भूतपूर्व राज्यमंत्री, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय श्री. ए.बु. तथा आबासाहेब निबाळकर हे ही प्रमुख पाहुणे म्हणन याप्रसंगी उपस्थित राहिले आपणही प्रचंड संस्थेने उपस्थित राहीलात आमच्या ट्रस्टच्या कार्यका चा आनंद द्विगणित केला. या संदर्भात मी स्वतः ट्रस्टच्यावतीने आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करीत आहे.