ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो असे विचारवंतानी म्हटले आहे. अशाच ध्येयातून काही माणसे आपली वाटचाल करतात. खंडाळा , ता. वैजापूर सारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी कुंटूबात कचरू वेळंजकर यांचा १० जुन १९६७ रोजी जन्म झाला. शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुंटूंबात जन्माला आल्याने बालपणापासुनच वेदना, दुःख, सामाजिक भान ह्या जाणिवा निर्माण झाल्या. त्यातच कसबसे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील प्रशालेतच पूर्ण केले. १० वी. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या कचरू वेळंजकरांच्या मागे बहिणींची व कौंटूबिक जबाबदारी असल्याने इच्छा असुनही आर्थिक परिस्थिती अभावी महाविद्यालयीन शिक्षण दुस्थपात झाले. पुढे शिकता न आल्याची खंत आजही ते व्यक्त करतात.
युवक या देशाचा कणखर आधारस्तंभ म्हणूनच की काय ? गावातल्या विविध उत्सवांमध्ये सहभाग, लग्नकार्यात हातभार, विविध मंडळाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभागामुळे परोपकारी वृत्ती वाढीस लागली. त्यातच वडीलांच्या नंतर जबाबदारी येऊन ठेपल्याने औरंगाबाद शहरातील मिटकर यांच्या रंजना या मुलीचे स्थळ सांगुन आले. रंजना मिटकर यांच्याशी झाला. सासऱ्यांचां तेलाचा व्यवसाय असल्याने त्यांना. मदत करत आपल्या कुटूंबासह दोन्ही कुंटूबांची यशस्वीपणे जबाबदारी वेळंजकर यांनी पार पाडली. व्यवसायामुळे शहरातही चांगले संबध प्रस्थापित झाले तरीही खेड्याची नाळ घट्ट असल्याने गावातील शाळेच्या मुलामुलींना शालेय साहित्य पुरवुन प्रेरणा देण्याचे कार्यही सतत चालू ठेवले.
जीवन जगतांना स्वतःसाठी कार्य करतांना दुसऱ्यांच्या उपयोगी पडावे ही भावना जोपासुन त्यांनी जिल्हाभर तिळवण तेली जय संताजी रोमाजसेवा मंडळाची स्थापना केली. स्वत: जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर कायांस वाहून घेतेले. मंडळाच्या माध्यमातून समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहकार्याबरोबर त्यांचा यथोचित
गुणगौरव दरवर्षी केला. समाज मंडळाचे कार्य करतात. तैलिक समाजातील नेतृत्वाचे लक्ष वेधले गेल्याने कचरू वेळंजकर यांना औरंगाबाद जिल्हयाचे तैलीक युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणुन कार्य करण्यास संधी मिळाली. पदाचे महत्व वाढवून जिल्हाभरात विद्यार्थी गुणगौरव, तालुकानिहाय समाज मेळावे, वधु-वर परिचय मेळावे, गुणवंत समाज बांधवांचा गौरव, संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव आदी भरगच्च कार्यक्रम राबविले जात आहेत. गेल्या सात वर्षापासुनच्या अव्याहत समाजकार्याची दखल घेऊन त्यांना मराठवाडा विभागाचे अध्यक्ष म्हणुन नुकतीच निवड झाली, आहे.
स्वार्थविरहीत कार्य करण्याची तळमळ, हाती घेतलेले कार्य तडीस नेणे हा मुळ स्वभाव यामुळे भाऊ जिल्ह्यासह मराठवाड्याबरोबरच शेजारील नगर, नाशिक जिल्ह्यांसह खान्देशातील समाज बाधवांनाही सुपरिचीत आहेत. कार्यात झोकून दिले असतांनाच हृदय विकाराचा चार वर्षापूर्वी झटका येऊन गेल्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर वर्षभर आराम करून तीच गती कायम ठेवून कार्य वाढवल्याने भगवंताचा प्रसाद समजून सामाजिक कार्यात वाहुन घेतले आहे. - एवढा प्रसंग ओढवल्यानंतर कार्यकर्त्यांना ते म्हणतात माणसाने आपल्या स्वत:च्या सुख-दुःखाचा विचार न करता इतरांचेही जाणले पाहिजे म्हणुन की काय त्यांनी गावातील राच्या शेजारी असणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या गुणांना प्रेरणा देत साने गुरूजी प्रतिष्ठाण, वैजापुर नावाची चळवळ उभी करण्यास सहकार्य करून भव्य असे पहिले राज्यस्तरीय ग्रामिण साहित्य संमेलन खंडाळा गावात ८ एप्रिल २००३ रोजी यशस्वी केल्यानेच आजपर्यंत साहित्य चळवळीला इतिहासात चार संमेलन भरवली गेली असुन साने गुरूजी प्रतिष्ठानचे राज्यपाध्यक्ष म्हणुनही ते कार्यरत आहे. साहित्याच्या आवडीने ग्रामीण भागातुन
प्रकाशित होणाऱ्या साहित्यपुष्प' या मासिकाचे ते 'सहसंपादक' म्हणुनही कार्य करतात. तेली समाजाचे व्यापक कार्य लक्षात घेऊन. म. रा. ओबीसी संघर्ष व जनजाकरण समितीने त्यांना जिल्हासंघटक म्हणून कार्य करण्यास वाव दिला असुन व्यवसायाच्या क्षेत्रातील संघटनाचा उत्तम वापर करीत औरंगाबाद जिल्हा व्यपारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारीणी वर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणुनही वेळंजकर कार्यरत आहेत.
कचरू वेळंजकर यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, संस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात असल्याने अनेक शाळांमध्ये, संस्थाच्या उपक्रमात त्यांना उद्घाटक, प्रमुख आतिथी म्हणुन आंमत्रित केले जाते. धार्मिक कार्यात संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव, पालखी सोहळा, दत्त जयंती उत्सव, कार्तिक स्वामी उत्सवाचे अयोजन त्यनिमित्ताने भजन संध्या, गीतसंध्याचे आयोजनही ते करतात. विधायकतेच्या वाटेवरच्या कार्याची दखल म्हणुन त्यांना महाराष्ट्रातील विविध संस्थानी गौरव केले त्यात उल्लेखनीय असे समाजसेवा पुरस्कार, कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, उत्कृष्ट समाजसेवा सेवक पुरस्कार, त्यांना प्राप्त असुन स्वत: निर्व्यसनी असल्याने अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतात.
सर्वच क्षेत्रात आघाडी घेऊन अव्याहतपणे कार्य करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याची ही चळवळ राज्यभर जाऊन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची भविष्यात संधी मिळो हीच शुभेच्छा !
:- राजेंद्र दिघे, ऑक्टोबर तेली गल्ली 2009