राहुरीच्या सोनवणे यांचा वडापाव व तेली समाज नेतृत्व.

    समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्‍याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
    4/5 वर्षा पुर्वी राहुरी येथुन सातत्याने फोन मी सोनवणे बोलतोय. राहुरीत अनेक वेळा गेलो परंतु हे नाव परिचित नव्हते. म्हणुन एक वेळ राहुरी स्टॅडंवर उतलो. चौकशी केली वडेवाले सोनवणे ते स्टँडच्या गेटच्या बाहेर वडापाव विकतात. समाज अध्यक्षांची जी ठरावीक चौकट आहे. या चौकटीला बाजुला सारत मी जेंव्हा त्यांच्याजवळ पोहचलो तेंव्हा मला श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे समजुन आले. अंदरसुल ता. यवला, जि. नाशिक येथील नरसिंह सोनवणे उचल तेल्या लाट दुसरे गाव गाठ हा शाप घेऊन आपली वेळ वाईट आहे. या वेळेला मागे सारू ही जिद्द ठेवून ते चालु लागले. राहुरी येथे आल्यावर बरोबर असलेल्या पाटीत करडी तेल, शेंगतेल, खोबरेल तेल घेतले. दारो दारी हाळी देऊन तेल विकु लागले. येणार्‍या पैशावर घर चालवु लागले. श्री. दत्तात्रय हे मोठे चिरंजीव ते आठवीत शाळेत शिकत असतानाच वडिलांना अंधत्व आले. हाळी पाटी बंद होवु लागली. पेटती चुल विझु लागली. श्री. दत्तोबांनी पाहिले आपली चुलविझु लागली आज निखारे आहेत. उद्या तेही विझतील आणी त्यांनी सायकलच्या हवा गेलेल्या चाकात हवा भरली व सायकल राहुरी परिसरात फिरू लागली यातुनच मग भांड्याच्या दुकानात काम कर लागले. नशीब कोण पुजत नसते नशीब कोण लिहीत नसते. नशीबाला आपनच आपले घडवत आसतो. हे संस्कार वडीलांनी दिलेले नशीबाला, कर्माला दोष देण्यापेक्षा धडपडीला देव मानला. धडपड हाच परेश्‍वर मानले घरातल्या सायकलीला डबा बांधुन आईसक्रिम गाडी हाक मारू लागली. वडापाव विकत घेताना. पोटाची भुक शांत करताना डोक्यात विचार येत हा व्यवसाय आता करावा. परंतु जवळ पैसे नाहीत. याच वेळी 1995 मध्ये लग्न झाले. जबाबदारीत भरच पडली. दरम्यान 1996 मध्ये अधीक महिना होता. या आधिक महिन्यात मिरजगाव येथे सासुरवाडीला बोलावणे आले. धोंड्याचे जेवण होताना एक सोन्यांची आंगठी मिळाली. ती अंगठी घेऊन येताना एक जिद्द व अत्मविश्‍वास आला. घरातल्या सर्वाबरोबर चर्चा करून ती अंगठी मोडून पैसे घेतले. यातील 1200 रु. घरातले धान्य भरून ठेवण्यासाठी दिले. ते धान्य असेल तर घराचा प्रश्‍न काही काळ मिटेल राहिलेले 1200 रूपये व्यवसायात गुंतवले यातुनच वडापावची गाडी राहुरी स्टॉडच्या बाहेर लावली व्यवसाय नवीन अनुभव नाही. सोबतीला इतर व्यवसायीक त्या व्यवसायीकां बरोबर मैत्रीचे संबंध ठेवले. स्पर्धा न करता व्यवसाय करु लागले. तुम्ही जगा मला ही जगु द्यात या भुमीकेतुन वडा पावला स्थिरता आली. आचारी काम, स्वत: करून उभे राहले ते आज पर्यंत आचारी व गल्ला स्वत: संभाळून ते वाटचाल करतात. या सगळ्या वाटचालीत त्यांचे लहान बंधु श्री. संदिप यांचा सिंहाचा वाटा आहे. दैववादी बनन्या पेक्षा कर्मवादी आसने ही वाटचाल त्यांची ही परिस्थितीत रडगाणे गाण्यापेक्षा काम करून यश कमविणे ही धडपड जोउीला समाजीक जाणीव उणीवांची ठोक समीक्षा त्यावर स्पष्ट भुमीका यामुळे संदीप सुजान बांधव म्हणुन परिचीत आहेत.
    सोनवणे बंधु हे वडापाव वाले व्यवसाय कोणताही असो पण जिद्द प्रमाणीक पणा, सचोटी असेल तर त्यावर आपण राज्य करू शकतो. तो व्यवसाय कसा करता यावर सर्व अवलंबुन आसते. सोनवणे बंधुनी आपल्या कृतीने हे सर्व सिद्ध केले आहे. घरातली चुल पेटली पाहिजे त्यावरचा तवा तापला पाहिजे. तापल्या तव्यावर भाकरी भाजली पाहिजे. ही भाजताना ज्या यातना झाल्या ह्या यातनाचा त्यांना माणुस म्हणुन घडविण्यास समर्थ ठरल्या. यामुळे वरवरची वेदना नकोतर वेदनेचे मुळ नष्ट झाले तरच समाज घउेल ही त्यांची स्पष्ट मते. या मताशी प्रामाणिक राहिल्या मुळे राहुरी तेली समाजात आपली ओळख निर्माण केंलेली जेंव्हा तेली महासभेला राहरी तालुका अध्यक्ष हवा आहे हे समजले तेंव्हा राहुरी तालुका बांधवांनी त्यांना एकमुखी पाठींबा दिला त्यामुळेच त्यांनी समाजाची जणगनना करणे, एक कत्रीत रित्या संताजी पुण्यतिथी साजरी करणे दिनदर्शीका प्रकाशीत करणे. विचार विनिमयातुन सामाजीक अडचणी निवारण करणे ही वाटचाल ठेवली सोनवणे बंंधुच्या वाटचालीस शुभेच्छा.

दिनांक 24-10-2015 00:40:50
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in