ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 1) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
समाजातील सुज्ञ बांधव श्री पन्हाळे साहेब (पोलिस सब इन्पेक्टर) यांनी जेंव्हा सुदूंबर ते पंढरपूर या संत संताजी महाराजांच्या पालखी दरम्यान वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रमुखांनी आंदोलन पुकारले होते. तेंव्हा विचारले त्या बद्दल मी माझे मत थोडक्यात दिले पण आज ते सविस्तर मांडत आहे. हा विचार प्रपंच मांडण्या पूर्वी आपणा विचार वंश प्रथम समजुन घेऊ. संत संताजी ज्या जगनाडे कुटूंबात जन्मले तो त्यांचा रक्ताचा वंश ज्या समाजात जन्मले ती त्या समाजाची साठवण व त्याग निष्ठा, भक्तीची शक्ती. पण विचार वंश म्हणजे. ज्या तत्त्वाने ते उभे राहिले. ती तत्वे नक्की कोणती होती. त्या विचाराने वाटचाल करीताना किंवा तो विचार जनमानसात रूजविताना त्यांना ज्या विचार प्रक्रियेच्या विरोधात दोन हात करावे लागले ती मंडळी अशी का होती. आणि त्यांच्या विकृतीला लोळवताना संताजींना ज्या यातना झाल्या त्या यातना सहन करून त्यांनी जी मानवता उभी केली. ही मानवता म्हणजे विचार वंश. आपला जर विचार वंश पाहिला तर त्याची सुरूवात इ.स. १२०० मध्ये सापडते संत तुकारामांनी आपले अभंगात स्पष्ट मांडले आहे की माझ विचाराची परंपरा माझे नाते संत नामदेवाशी आहे. संत नामदेवाच्या सामाजीक क्रांतीत संत ज्ञानेश्वर स्वतःहून आले. त्या वेळी बलुतेदार वर्गातील पोळलेल्या समाजातील जात समुहातील संतांनी भेदाभेद न करणाऱ्या विठ्ठल आपला मानला व ब्राह्मणी विचार प्रणालीने आडगळीत ठेवलेला विठ्ठल हे त्यांचे मता, पिता, भक्ती शाक्ती झाले. हा संत नामदेवांचा विचार वंश. ह्या विचार वंशात त्याकाळी तेली समाजातील संत जोगा परमानंद हे पंजाबातून संत नामदेवा बरोबर आलेले होते. की ज्यांची आडगळीत ठेवलेली समाधी बार्शी येथे आज ही आहे. समतेची ही परंपरा समतेचा विचार वंश संत तुकारामांनी आपला मानला. संत संताजींनी तो आपला मानला व जन माणसात रूजविला. तर तो संत संताजींचा विचार वंश खरोखर दहशदी खाली आहे का ? तो असेल तर तुम्ही आम्ही काय करणार आहोत. ही मांडणी चुक असेल तर सत्य सांगा आम्ही जाहीर माघार घेऊ.