ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 3) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
काही वर्षा पूर्वी तेली समाजाच्या पुढाऱ्यांना आषाढी वारीत पंढरीचा संदेश या साप्ताहिकाची मंडळी भेटली. ब्राह्मणा भेटला म्हणजे सर्वस्व भेटले ही आमची आंधळी वाटचाल. पुढाऱ्यांनी पदरमोड न कराता समाजाची पदरमोड करून पंढरी संदेशचा अंक काढला होता. त्या अंकातील लबाडी पणावर मी त्यावेळी पूराव्यानिशी मांडले होते. इथे या विषया पूरते मांडतो. संत तुकाराम सामाजिक समता, राजकीय समता, देवा जवळची समता आपल्या अभंगातून मांडत होते. आहेरे वाल्यांचा त्यांना नुसता विरोध नव्हता तर शस्त्राचा धाक व स्वतःच्या विकासासाठी स्वतः तयार केलेल्या शास्त्राची अस्त्रे होती तर. ज्यांच्याकडे काहीच नव्हते अशा होरपळलेल्या समाजाकडे काहीच नाही. तेव्हां हा समाज संत तुकोबांच्या या लढाईत अस्ते अस्ते सामिल होत होता. तुकारामांनी स्वतःला कुणबी आहे याची नोंद अभिमानाने सांगीतले आहे. संत तुकोबांचे कुणबी पण व सवलती साठी लबाडी करून कुणबी जातीची प्रमाण पत्रे घेणारे यांच्या विषयी मी मराठे आपले भाऊ आहेत का ? या पुस्तकात मांडले आहेच. त्यामुळे आजचे कुणबी लबाडिने दाखला मिळवितात त्या लबाडांना ही तुकोबा समजले नाहीत. त्यांना गावचा सरपंच, जिल्हा परिषदेचा सदस्य तेली, माळी, न्हावी, कुंभार, सुतार होणे ही एक चिड आहे . तेंव्हा इथ एक समजून घ्या आजचे बरेच मराठे हे समता विसरून आहेत. आणि खरे कुणबी पण विसरून स्वार्थी बनू पहातात. त्यांना उत्तर देण्यास आपण कचरतो हा आपला नेभळटपणा आहे. तर हे थोडे आजच्या या विषयाला थोडे विषयांतर झाले. कारण त्या वेळचा कुणबी राजकर्ता नव्हता. तेली आणि कुणाबी एकाच सामाजीक वेदना घेऊन जगत होता. शासनकर्ते मोंगल तर धार्मीक कर्ते ब्राह्मण यात भरडलेले समाज हे उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण व मराठ्यातील प्रगत पोटजाती नव्हत्या. आणि म्हणून मंबाजी गोसावी व रामेश्वर भट या ब्राह्मण अतिरेक्यांनी संत तुकाराम व संत संताजींचा अतोनात छळ केला. संत तुकोबांना जी शिक्षा दिली ती हिंदू धर्माच्या नव्हे तर ब्राह्मणी आचार विचार व कृतीच्या मनुस्मृतीला आधार ठेऊन. ते हे रामेश्वर भट की ज्यांना सर्व केल्या नंतर असे लक्षात आले आपली शिक्षा ही तुकोबांना नसून ती आपल्यावर उलटू पहातेय. कारण तुकोबांना बहिष्कृत पणाची शिक्षा संत संताजींच्या नियोजन बद्ध वाटचालीने व संत तुकारामांच्या सामाजीक कार्यामुळे मनुस्मृतीचा कायदा खऱ्या अर्थाने नदीत बुडवला. जगण्याच्या साधनाची लक्तरे होऊ नयेत म्हणून रामेश्वर भटांनी खऱ्या अर्थाने तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. अगदी जीवनाच्या शेवटच्या टप्यात. संघर्षाच्या पहिल्या टप्यात संत तुकोबा बरोबर संत संताजी पण शेवटी रामेश्वर भटाचा प्रवेश झाला. तरी संताजी तुकोबा बरोबर होते. पण दोघांच्या निधना नंतर. संताजीना त्यांच्या पासून दूर लोटून रामेश्वर भटांना पडद्या आडून महात्म देऊ लागले. त्याचा जबरदस्त पुरावा म्हणजे पंढरपूरचा पंढरी संदेशचा काही वर्षा पूर्वीचा अंक. अंक संत संताजी विषयी पण महात्म कथन केले रामेश्वर भटाचे तुमच्याच पैशाने तुमचे महत्व कमी करून आपले महत्व वाढविणे ही परंपरा संत नामदेवांना समते पासून दूर नेहण्याचा विचारांचा वंशच आहे. इथे एक दूसरा मुद्दा मांडून पुढे जातो. संत बहीणाबाई यांच्या विषयी. माझ्या मनात आदर जरूर आहे. त्या सुद्धा संत तुकारामांचे अलौकिक अभंंगाने पांंडूरग मय झाल्या. परंतू जाणीव पूर्वक त्यांचे महत्व वाढवून संत संताजी व संत तुकारामांच्या तर त्यांना भविष्यात काय असणार हा विचार संत तुकारामांच्या नंतर झालेला आहे.