ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 5) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
संत साहित्याचे अभ्यास वि. ल. भावे गाढे आभ्यासक दत्तो वामन पोतदार हे जन्माने ब्राह्मणा होते. परंतू त्यांनी संत संताजींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला किंवा संत संताजी हा एक मानवतेचा महामार्ग आहे ही ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार प्रथम मी मानत आहे. जे आहे त्याला आहे म्हंटलेच पाहिजे खोटे आहे त्याला खोटारडे म्हणून सारलेच पाहिजे. मग इथे कोणाच्या बाला का घाबरायचे. हा डगमगणारा खरा संताजी विचार आहे हाच खरा संताजी विचार वंश आहे. तर मुद्दा असा आज जी संत तुकारामाची गाथा आहे त्याचा आपण आढावा घेऊ संत तुकारामांच्या नंतर रामेश्वर भट किंवा इतर मंडळींनी समाजात उमटलेला आपल्या विषयीचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला असावा पोटातला राग शांत नव्हताच. हा राग या पिढीकडे हस्तांतरीत होत होता. पेशवाई तर तुकोबाच्या अभंगांना बंदी होती. या वेळी तळेगाव दाभाडे येथिल त्रिंबक कासार याने काही अभंग फडात जावून उतरवून ठेवले. हा काळ तुकोबा नंतर साधारणतहा शंभर वर्षांचा. त्या पुर्वी संत संताजीच्या हस्ताक्षरातील काही वह्या गुपचूप लंपास झाल्या. चाकण येथिल एकाने त्याचा शोध घेतला त्या विषयी त्यांचे अस्पष्ट लेखन सापडते त्यांना ही शोध पुर्ण करता आला नाही. परंतू इंग्रज मिशनऱ्यांना त्यांचा धर्म प्रचार करिताना सत्य जाणवले. अडाणी, अज्ञानी समाजमनावर संत तुकाराम व त्यांची मानवता, त्यांचा विद्रोह जोकोरला आहे तो पुसता येणार नाही. काही इंग्रज अधिकारी तुकोबांच्या खऱ्या मानवते साठी शोध घेऊ लागले आणि एका अधीकारी तुकोबांच्या खऱ्या मानवते साठी शोध घेऊ लागले आणि एक अधीकाऱ्याने पंडीत शास्त्रींना संत तुकोबांच्या मोडीतील अभंगांचे देवनागरी करण्याचे काम दिले. या वेळी पंडीतांनी तुकोबांच्या वंशजाकडून वह्या घेतल्या त्रिंबक कासरच्या वह्या घेतल्या. कडूसकरांच्या कडून वह्या घेतल्या. पंढरपूरला शिरवळकर कडील परंपरेने जतन केलेल्या वह्या घेतल्या. तुकोबांचे चिरंजीव महादेव यांनी लिहून ठेवलेल्या वह्या होत्या. कडूसकर हे जन्माने ब्राह्मण होते पण तुकोबांच्या सामाजीक परिवर्तनातले सोबती होते. त्रिंबक कासार हे बहुजन होते व त्यांनी फडात जाऊन तोंड पाइ असलेले अभंग गोळा केले होते. इथ शंका घेऊ नये इतपत सत्य आहे. परंतू शिरवळकराकडे ज्या वह्या होत्या त्या परंपरेने चालत आलेल्या. या परेपरेत बरेच घडले आसते. दडवले आसते. या नावाखाली बरीच गैरसोयीची सोय केलेली आसते. प्रश्न असा पंडीतांनी जे देवनागरही करण केले ते पाठभेद शब्दभेद करिताना काही गोष्टी साध्य केल्या. हे ही मान्य करू. पण देवनागरी करण होताच तुकोबाच्या वंशाजाकडील वह्या व त्रिंबककासारा कडिल वह्या गायब होतात. सुस्थीतीत रहातात फक्त शिरवळकरकडील वह्या. ही बनवेबीरी महाराष्ट्र शासनाच्या गाथेत मला स्पष्ट सापडली. या मंडळींनी संत संताजींच्या वह्यांना जाणीवपुर्वक कोपऱ्यात ठेवले असणार ? पण जेंव्हा इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्यामुळे कुठे सत्य बाहेर येऊ लागले तेंव्हा चलबिचल झाली. वि.ल.भावे यांनी प्रथम संत संताजींच्या हस्तक्षरातील अभंग रचना देवनागरीत मांडली. त्यांनी योग्य न्याय दिला का नाही हा प्रस्न आहे पण उत्तर देण्यासाठी भावेंची गाथा उपलब्ध होत नाही. ती अशीच कुठे तरी अडगळीत असेल. हा संत संताजींना नावानिशी कार्यानिशी संपविण्याचा कुटिल डाव आणि संत संताजीचे नाव घेऊन सत्तेत होते ते आहेत किंवा सत्ता मिळवू पहातात ते समाजाचे पुढारी हे बिन बुडाचे आहेत. त्यांना ही खरा संत संताजी नको आहे. संताजीच्या नावाने सत्ता हवी आहे. मोठे पणा मिरवायचा आहे. म्हणून या पुढाऱ्यांना संताजीचे मारेकरी म्हणावे का ? असा सोपा रस्ता कधी रास्त वाटतो.