ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ?( भाग 6) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
माझ्या वयाच्या १९ व्या वर्षी दासबोध खरेदी केला होता. रामदास स्वामींच्या या ग्रंथाचे तेंव्हा ही वाचन केले होते. त्यांचे सर्वच विचार चुकीचे आहेत हे म्हणने चुकीचे आहे. परंतू त्यांनी जो ब्राह्मणी वर्चस्वाचा अहंकार जेथे जेथे केला तेथे तेथे आपण होकार न देता नकार देणे हे तेली म्हणुन माझे मी पहिले कर्तव्य करतो. आणि ते केलेच पाहिजे. कारण आज सामाजिक, राजकीय, अर्थिक कुचंबना पावलो पावली होते त्यांची ही मुळे आहेत हे जरी समजले तरी आपण संत संताजीच्या विचाराचे वंशज म्हणून घेण्यास लायक असू. संताजी एक तेली म्हणून जन्मले पण मानवते साठी लढले आसा हा लढणारा सेनापती संत तुकारामांच्या सामाजीक परिवर्तनाचा सर सेनापती. संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांची अनेक वेळा भेट होणे. लोहगाव सारखे अनेक ऐतिहासिक क्षण दोघात असणे या बाबी आपण जरूर जपुण ठेवा. अधीक शोधा. संत तुकाराम सामाजीक समता मिळवत होते. शिवराय राजकीय विषमतेत भरडलेला समाज स्वातंत्र करीत होते. तुकोबांची सामाजीक चळवळ ही शिवरायांच्या स्वातंत्र संग्रामाला पोषक होती. आणि मराठा समाजातील काही संघटनांनी काही विचारवंतानी संत तुकाराम व छत्रपती शिवराय यांचे नाते गुरूशिष्यांचे स्पष्ट पणे मांडले. या मांडणीला आपण कधी दाद दिली का ? यातील बारकावा न्याहाळला का ? संत संताजी विषयी विशेष अंक काढून रामेश्वर भटाला मोठे करणारा पंढरीचा संदेश हा दिवाळी अंकाचा प्रकार आपण डोक्यावर घेत असू तर संताजी विचार वंश आपणच खुडत आहोत हे स्पष्ट होते. शिवरायांचे गुरूपद जेंव्हा मराठा समाज संत तुकोबांना देत असेल तर एक गोष्ट आपण विसरू नका. या संत संताजींचे ही मोठे पण आहे आणि हे मोठे पण आपण आपल्या हाताने दूर सारणार आसू तर आपण संत संताजीचा विचार वंश संभाळत आहोत का ? आपल्या हिता पुरता तरी त्यांच्या स्वरात सुर मिसळला पाहिजे. याच मराठा संघटनांनी आपल्या ओबीसी सवलतीवर टाच मारू पाहिली तेंव्हा मी स्वतः माझ्या ओबीसी 1. संघटने तर्फे रस्त्यावर उत्तर ही उतारून दिले आहे. व देत आसतो. मराठा समाजाच्या ओबीसीपणावर एक पुस्तीका प्रसिद्ध करून जागृती केली. पण रामदास स्वामी हे छ. शिवरायांचे गुरू नव्हते तर गुरूपद हे संत तुकारामांना आपण ही दिले पाहिजे. आणि जो कोणी याला पडद्या आडून विरोध करीत असेल तर त्याला साथ तरी देताना आपण संत संताजींचे विचार वंश आहोत याचे भान जरूर ठेवले पाहिजे.