शिक्षण आहे, नोकरी नाही, खिशात पैसा नाही म्हणुन व्यवसाय नाही म्हणुन पैसा नाही हे रडगाणे गात बसण्यापेक्षा आपण यावर ही यश कमवु शकतो हे राहुरी जि. नगर येथील श्री. संजय विठ्ठल पन्हाळे यांनी सिद्ध केले आहे. वडिल विठ्ठल पन्हाळे हे संगमनेर येथे उमेदीच्या काळात ओल्या, भाजक्या शेंगाची गाडी लावत होते. ही गाडी लावता लावता भाजीपाला विक्री करू लागले. यातुनच गावकामगार तलाठ्याची नोकरी लागली. वडीलांची जवळ जवळ सर्व नोकरी ही राहुरी परिसरातच गेली. त्यामुळे कुंटूंबाला स्थिरता आली. श्री. संजय पन्हाळे राहुरी येथे शिक्षण घेऊ लागले. 12 वी नंतर इंजीनेरिंगला प्रवेश करण्यासाठी नगर ते धुळे मार्गावर राहुरी जवळ ढाबा व्यवसाय 1993 मध्ये सुरू केला. यातुन स्थिरता येत होती परंतु या पेक्षा दुधाचा व्यवसाय करावा ही मनधारणा तयार झाली. ढाबा व्यवसायाने दुधाचे गणीत समजुन आले. सुरवातीस 10 लिटर दुध पिशवीत घेतले सायकलला पिशवी अडकवून किराणा दुकानदार हॉटेलवाले, लस्सीवाले शोधले. दहा लिटर दुध खपले या दहाचे शंभर लिटर पर्यंत गेला. आणि काही वर्षात विक्रीचा उच्चांक 3500 हजार लिटरच्या पुढे जाऊ लागले.
दहा लिटर पिशावीत टाकुन सायकलचे पॅडल मारत असताना जर ते कंटाळले आसते डगमगले आसते. मागे फिरले आसते तर 3500 हजार लिटर दुध खपवु शकले नसते. हुतात्मा व राजहंस दुध उत्पादका बरोबर चोख व्यवहार, हॉटेल, किराणा दुकान लस्सीवाले यांना दुध देण डेरीचे दुकान आई, वडील व पत्नी संभाळतात. आज मोठा मुलगा बि.एस.सी. करून व्यवहारात लक्ष देतो तर लहान मुलगा 11 वी शिकत आहे तर मुलगी कृषी पदवीका घेतललेली आहे. शिक्षण आहे पैसा नाही किंवा शिक्षण कमी पैसा ही कमी असे म्हणुन प्रगतीच्या रस्त्यापासुन दुर जाणारे जेंव्हा भेटतात तेंव्हा श्री. संजय विठ्ठल पन्हाळे यांचा आदर्श हा मोठा आहे. परस्थिती सुधारण्यासाठी सर्व कुटूंबच उभे रहाते व यश संपादन करू शकते. हा आदर्श या ठिकाणी मोठा आहे.