श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
डॉ. खैरनार गेल्या 20 वर्षापासून जामखेड येथे खाजगी वैद्यकीय व्ययसाय करीत आहेत. तसेच समाजाच्या इतर कामातही सहकार्य करीत आहे. जामखेड येथे तेल उत्पादक सहकारी सोसायटी निर्माण केली होती. ती तोट्यामुळे हल्लीबंद आहे. तसेच गेल्या 3-4 वर्षापासून जामखेडला संताजी महाराज पुण्यतिथी उत्सब साजरा केला जात आहे तसेच पुढील उत्सवापर्यंत जामखेड येथील विठ्ठल मंदिरात श्री संताजी महाराज यांची मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. आपण आज मला यंथे बोलावून जो माझा सत्कार केला. त्याबद्दल मो सर्वांचा ऋणी आहे.
व्यक्ति परिचय
संपूर्ण नाव- डॉ. दशरथ भगवान खैरनार.
जन्मस्थळ- धुळे
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण- धुळे. महाविद्यालयीन शिक्षण- फर्ग्युसन कॉलेज, पुणे. वैद्यकीय शिक्षण- बी. जे. मेडिकल कॉलेजमधून 1954 साली एम. बी. बी. एस.
1955 ते 1966 ठाणे, कोल्हापूर, नगर व पुणे जिल्हयात मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी सेवेत 1966 दिवाळीपासून जामखेड येथे खाजगी व्यवसाय सुरु. जबाबदार्या
1) राष्ट्रीय स्वयसेवक संघ, जिल्हा अहमदनगर, जिल्हा संघ चालक. 2) अध्यक्ष, देवस्थान कमिटी ट्रस्ट, जामखेड.. 3) अध्यक्ष, इंडियन मेडिकल असो सिएशन, जामखेड. .4) अध्यक्ष, लोकमान्य वाचनालय, जामखेड. 5) सभासद, सल्लागार मंडळ, नागेश विद्यालय जामखेड.