घरात गरिबी आली तीने घराला कवटाळलेले अगदी संस्कारक्षम वयातच ही अवस्था झालेली. वडील सकाळी घरा बाहेर पडत हाळी देत फेरीवाल्यांची काम करीत या कामातुन चार पैसे जमा त्यावर घर चालत आसे. या वेळी मामा नादेवराव सोनवणे यांनी पहिले आपला भाचा नितीन यास संभाळले. शिक्षण ही देऊ केले. शिक्षण तरी किती फकत 11 वी या उमेदीच्या वयात वाईकरांना घरची अवस्था पहावेना त्यांनी विचार केला पुढील शिक्षणा पेक्षा नोकरी बरी. गावात चौकशी करून त्यांनी सेल्सनची नोकरी स्विकारली दुकानात येणारे गिर्हाईक हे गिर्हाईक असते त्याचा विश्वास संपादन करणे आपल्या मालाची वैशिष्टे स्पष्ट करून त्याला परवडेल व आनंदी होईल या पद्धतीने माल खपवने. विकत घेतलेला माल घेऊन गेल्यावर त्याचा विश्वास बसेल तो पुन्हा दुकानात येईल या साठी जे भाषण कौशल्य लागते ते येथे किलो. चार भिंतीच्या आतील शिक्षणातून पदवी मिळते या मिळालेल्या पदवीवर नोकरी मिळत नाही. उलट मी पदवीधर आहे. मी माझे का काम करू ही मानसिकता बनु शकते. परंतु या भिंती बाहेरच्या ओपन स्कुल मध्ये कागदाची पदवी मिळत नाही तर जगण्याच्या व्यवहाराची पदवी मिळते अनुभवातुन शिक्षण घेऊ लागलो माझे बर्या पैकी व्यवहारीक शिक्षण झाले आहे हे माझ्या मामाच्या लक्षात आले.
त्यांनी मला सल्ला दिला या नोकरीत तु ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणावरच या सेल्समन मध्ये राहाल. तो बदल हवा असेल तर एल.आस.सी. एजंट हो. मी सारा सार विचार करून एल.आय.सी. ची एजन्सी स्विकारली गावात चालावयास पाय होते तर खेडोपाड्यात जाण्यास सायकल होती यावर प्रवास सुर केला. वाड्या वत्स्यांवर तुटपुंज्या आळखी. परंत सेल्समन अनुभव जोडीला सुरू हे करीत असताना वाणीज्या शाखेची पदवी होती. या बळावर विश्वास देऊ लागलो. विश्वास मिळू लागला तरी सुरवातीची 4/5 वर्ष पश्रिश्रम व कष्ट घ्यावेच लागले. ती 1500 ग्राहकाच्या पुढे गेली दरवर्षी 10 कोटी टर्न होऊ लागला 50 लाख भांडवल होऊ शकले. या मुळे दरमहा किमान 50 हजार रपये कुंटूंबीयासाठी मिळवु लागलो.
घरच्या गरिबी मुळे मामाकडे 11 वी शिक्षण घेणारे वाईकर कापड दुकानात. काम करता करता बी. कॉम. ही झाले. पायी व सायकलवर जावुन खिशात पैसा नसताना व्यवसायात उतरले व आपले कुटूंब सुस्थितीत ठेवु शकले नोकरी नाही व्यवसायाला पैसा नाही मी काय करु हे रडगाने वाजवले नाही हा आदर्श वाईकराकडे नक्कीच आहे.